अॅंटीगा | विंडीजमधील सर विवियन रिचर्ड्स स्टेडियमवर बुधवार, ४ जुलैला सुरू झालेल्या विंडीज-बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात विंडीजने बांगलादेशला पहिल्या डावात १८.४ षटकात ४३ धावांवर बाद केले.
याबरोबर या सामन्यात अनेक विक्रमही झाले. ते खास विक्रम असे-
१) कसोटी क्रिकेटमध्ये १९७४ सालानंतर एखाद्या संघाने केलेल्या या निचांकी धावा आहेत. १९७४मध्ये भारतीय संघ लाॅर्ड्स कसोटीत इंग्लंडविरुद्ध ४२ धावांवर बाद झाला होता.
२)किमार रोचने ५ षटकात ८ धावा देत ५ बळी मिळवले. यात त्याने पहिल्या १२ चेंडूत ५ विकेट्स घेतल्या. याबरोबर त्याने ऑस्ट्रेलियाच्या मॉन्टी नोबेल यांनी 1902 साली इंग्लंड विरुद्ध 12 चेंडूत 5 बळी तर दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू जॅक कॅलिसने 2002 मध्ये बांगलादेश विरुद्ध 12 चेंडूत 5 बळींच्या विक्रमाची बरोबरी केली.
३) बांगलादेशची ही कसोटी क्रिकेटमधील निचांकी धावसंख्या आहे. त्यांनी यापुर्वी २००७मध्ये श्रीलंकेविरुद्ध ६२ धावा केल्या होत्या.
४) केवळ ११२ चेंडूत विंडीजने बांगलादेशचा संपुर्ण डाव संपवला. यापुर्वी केवळ एकदा १११ चेंडूत इंग्लडने आॅस्ट्रेलियाचा डाव संपुष्टात आणला होता.
५) या कसोटी सामन्यात केलेल्या ४३ धावा या कसोटी क्रिकेट इतिहासतील एका डावातील १०व्या निचांकी धावा आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-कुलदीप यादवसारखा गोलंदाज शोधून सापडणार नाही; महान खेळाडूने केले कौतुक
-मेस्सी-रोनाल्डो वाद पुन्हा पेटला; दापंत्याने घेतला घटस्फोट
असा काय विक्रम गोलंदाजीत झालायं ज्याची जगभरात आहे चर्चा!
विशेष मुलाखत- शिव छत्रपती पुरस्कार मिळाला की कबड्डी…