इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलर याने टी20 क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. सध्या इंग्लंडमध्ये टी20 ब्लास्ट लीग सुरू आहे. या स्पर्धेत त्याने शानदार खेळी साकारली आणि खास क्लबमध्ये एन्ट्री करण्याचा मानही मिळवला. खरं तर, बटलरने 39 चेंडूत 83 धावांची झंझावाती खेळी साकारली. त्यामुळे त्याने टी20 क्रिकेटमध्ये मैलाचा दगड पार करण्याचा विक्रम रचला. तो अशी कामगिरी करणारा इंग्लंडचा दुसरा आणि जगातील 9वा फलंदाज बनला आहे.
शुक्रवारी (दि. 23 जून) लंकाशायर विरुद्ध डर्बीशायर संघात टी20 ब्लास्ट (T20 Blast) लीगमधील सामना पार पडला. या सामन्यात लंकाशायरकडून खेळताना जोस बटलर (Jos Buttler) याने 39 चेंडूत 6 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 83 धावा केल्या. त्याच्या खेळीच्या जोरावर लंकाशायर संघाने 15 षटकात 4 विकेट्स गमावत 177 धावा चोपल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना डर्बीशायर संघ 15 षटकात 7 विकेट्स गमावत 150 धावाच करू शकला. त्यामुळे लंकाशायरने हा सामना 27 धावांनी जिंकला.
जोस बटलरचा विक्रम
या खेळीसह जोस बटलरच्या टी20 क्रिकेटमध्ये 10000 धावा पूर्ण झाल्या. त्याच्या नावावर आता 372 टी20 सामन्यात 34.16च्या सरासरीने आणि 144.70च्या स्ट्राईक रेटने 10,080 धावा झाल्या आहेत. टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ख्रिस गेल (Chris Gayle) याच्या नावावर आहे. गेलने टी20त 14562 धावा चोपल्या आहेत. गेलनंतर शोएब मिलक (12528) दुसऱ्या स्थानी आहे, तर कायरन पोलार्ड (12175 तिसऱ्या स्थानी आहे.
विशेष म्हणजे, या यादीत भारतीय संघाचे दोन खेळाडूही आहेत. विराट कोहली (Virat Kohli) चौथ्या स्थानी असून त्याच्या 11965 धावा आहेत, तर आठव्या स्थानी असलेल्या रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नावावर 11035 धावा आहेत.
जोस बटलर हा जगभरातील सर्व प्रमुख टी20 लीगमध्ये खेळतो. वर्तमानात तो आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स, एसएटी20त पार्ल रॉयल्स आणि ऑस्ट्रेलियाच्या बीबीएल स्पर्धेत सिडनी थंडर संघाचा भाग आहे. तो आयपीएलमध्ये आधी मुंबई इंडियन्स आणि बीबीएलमध्ये मेलबर्न रेनेगेड्स संघाकडूनही खेळला आहे.
टी20त सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
14562 – ख्रिस गेल
12528 – शोएब मलिक
12175 – कायरन पोलार्ड
11965 – विराट कोहली
11695 – डेविड वार्नर
11392 – ऍरॉन फिंच
11214 – ऍलेक्स हेल्स
11035 – रोहित शर्मा
10080 – जोस बटलर*
विशेष म्हणजे, आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही बटलरने केला आहे. त्याने आयपीएल 2022 हंगामात ऑरेंज कॅप आपल्या नावावर केली होती. त्या सामन्यात त्याने 17 सामने खेळताना 863 धावाही केल्या होत्या. विशेष म्हणजे, त्याच्या शानदार खेळींच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाने अंतिम सामन्याचे तिकीटही मिळवले होते. मात्र, राजस्थानला अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स संघाकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. (record alert england white ball captain jos buttler joined an elite list of t20 batsmen with 10000 runs)
महत्वाच्या बातम्या-
वसीम जाफरच्या प्रश्नांमुळे टीम इंडियाच्या निवडकर्त्यांना फुटेल घाम! संघ निवडीवर माजी सलामीवीर नाखुश
World Cup 2023 । शेड्यूलविषयी ‘असा’ आहे बीसीसीआयचा प्लॅन! तारीखही आली समोर