आयसीसी वनडे विश्वचषक 2023 क्वालिफायरच्या सुपर 6 फेरीतील 8वा सामना नेदरलँड विरुद्ध स्कॉटलंड संघात पार पडला. गुरुवारी (दि. 06 जुलै) क्वीन्सपार्क स्पोर्ट्स क्लबवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात नेदरलँड संघाने 4 विकेट्सने विजय मिळवला. तसेच, वनडे विश्वचषकात प्रवेश करणारा 10वा संघ बनण्याचा मानही मिळवला. या सामन्यात स्कॉटलंड पराभूत झाला असला, तरीही संघाचा युवा फलंदाज ब्रँडन मॅकमुलेन याने खास पराक्रम गाजवला. तो अशी कामगिरी करणारा स्कॉटलंडचा दुसराच खेळाडू बनला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंड संघाने 9 विकेट्स गमावत 277 धावा केल्या होत्या. या धावा करण्यात ब्रँडन मॅकमुलेन (Brandon McMullen) याने मोलाचे योगदान दिले. त्याने या सामन्यात शतकी खेळी साकारली. यासह त्याने नेदरलँडविरुद्ध ऐतिहासिक कामगिरी केली.
Scotland put on a good total on the back of Brandon McMullen’s ton ????
Can they defend this? ????#CWC23 | #SCOvNED: https://t.co/d9Ke8xm2zm pic.twitter.com/9MM0WMUGTY
— ICC (@ICC) July 6, 2023
स्कॉटलंडचा फलंदाज मॅकमुलेन याने 110 चेंडूत 106 धावांची खेळी साकारली. या धावा करताना त्याने 11 चौकार आणि 3 षटकारांचा पाऊस पाडला. यासोबतच स्कॉटलंड संघासाठी वनडेत शतक ठोकणारा ब्रँडन मॅकमुलेन दुसरा सर्वात युवा खेळाडू बनला. त्याने दुसऱ्यांदा ही कामगिरी केली. यापूर्वी त्याने 25 जून रोजी ओमानविरुद्ध 136 धावांची खेळी साकारली होती.
कमी वयात शतक ठोकण्याचा विक्रम
स्कॉटलंडकडून सर्वात कमी वयात शतक करण्याचा विक्रम मॅथ्यू मचान (Matthew Machan) याच्या नावावर आहे. त्याने केनियाविरुद्ध 2013मध्ये 22 वर्षे आणि 135 दिवसांच्या वयात हा विक्रम रचला होता. त्याने केनियाविरुद्ध 114 धावांची खेळी साकारली होती. मॅकमुलेन याने 23 वर्षे आणि 250 दिवसांच्या वयात शतक झळकावले होते. त्यानंतर आता 23 वर्षे आणि 261 दिवसांच्या वयात त्याने दुसरे शतक झळकावले. मॅकमुलेन याच्या शतकाच्या जोरावर स्कॉटलंड संघ 50 षटकात 277 धावा करण्यात यशस्वी झाला. त्याच्याव्यतिरिक्त रिची बेरिंग्टन याने 64 धावांची खेळी साकारली.
नेदरलँडचा विजय
विशेष म्हणजे, वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेसाठी क्वालिफाय करण्यासाठी नेदरलँडला 44 षटकात 278 धावा करायच्या होत्या. मात्र, नेदरलँडने हे आव्हान 42.5 षटकात 278 धावा करून पार केले. तसेच, विश्वचषकातील आपले स्थान निश्चित केले. यावेळी नेदरलँडकडून बास डी लीड (Bas De Leede) याने अष्टपैलू कामगिरी केली. त्याने आधी स्कॉटलंडविरुद्ध गोलंदाजी करताना 10 षटकात 52 धावा खर्च करत 5 विकेट्स घेतल्या. त्यानंतर फलंदाजी करताना 92 चेंडूत 123 धावांची शानदार शतकी खेळी साकारली. त्यामुळे स्कॉटलंड संघाचे विश्वचषकासाठी क्वालिफाय करण्याचे स्वप्न तुटले. (record brandon mcmullen youngest players to score odi centuries for scotland)
महत्वाच्या बातम्या-
हार्दिक आणि विजयसोबतच्या तुलनेविषयी शिवम दुबेचे मोठे विधान; म्हणाला, ‘मी इतर खेळाडूंना…’
माजी सलामीवीराचे धक्कादायक विधान! पहिल्यांदाच भारतीय संघात निवडलेल्या तिलकबद्दल म्हणाला, ‘चुकीचा निर्णय…’