रांची । उद्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी२० सामना येथे होणार आहे. भारतीय संघाने गेल्या ६ वर्षात ऑस्ट्रेलिया संघाला एकही टी२० सामना जिंकून दिलेले नाही. या मालिकेत भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण ३ सामने खेळणार आहे.
या मालिकेत होणारे विक्रम-
#१
विराट कोहली करू शकतो आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत २००० धावा. सध्या त्याच्या नावावर ५० सामन्यात १८३० धावा. त्याला आणखी १७० धावांची ३ सामन्यात गरज.
#२
विराटने जर ६० धावा या मालिकेत केल्या तर आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर विराजमान होईल. सध्या पहिल्या स्थानावर २१४० धावांसह ब्रेंडन मॅक्क्युलम तर दुसऱ्या स्थानावर १८८९ धावांसह तिलकरत्ने दिलशान आहे.
#३
आशिष नेहरा आणि जसप्रीत बुमराह या दोंन्ही गोलंदाजांनी आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत ३४ विकेट्स घेतल्या आहेत. यासाठी बुमराह २५ तर नेहरा २६ सामने खेळला आहे. उद्या जो गोलंदाज विकेट्स घेईल तो अश्विन (५२) पाठोपाठ सर्वाधिक टी२० विकेट्स घेणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी जाईल. आता दोघेही दुसऱ्या स्थानावर आहेत.
#४
उद्याच्या सामन्यात जर विराटने ३३ धावा केल्या तर रांची येथील मैदानावर आंतरराष्ट्रीय सामन्यात ३०० धावा करणारा विराट जगातील पहिला खेळाडू बनेल. त्याने ५ सामन्यात ११३.५०च्या सरासरीने २६७ धावा केल्या आहेत.
#५
एमएस धोनीने या मालिकेत जर ५१ धावा केल्या तर आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत भारतात ५०० धावा करणारा विराटनंतर तो दुसरा खेळाडू ठरेल. विराटने १७ सामन्यात भारतात ५७८ धावा केल्या आहेत तर धोनीने २३ सामन्यात ४४९ धावा केल्या आहेत.