डब्लिन । बुधवारी भारत विरुद्ध आयर्लंड पहिला टी२० सामना होणार आहे. या मालिकेत भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध एकूण २ टी२० सामने खेळणार आहे.
यापुर्वी या दोन्ही संघात केवळ एक टी२० सामना झाला आहे. त्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे.
या टी२० मालिकेतही अनेक खास विक्रम होऊ शकतात. ते असे
#१
विराट कोहली करू शकतो आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत २००० धावा. सध्या त्याच्या नावावर ५७ सामन्यात १९८३ धावा. त्याला २ सामन्यात १३ धावांची गरज.
#२
या मालिकेत विराटने जर १५८ धावा केल्या तर आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर विराजमान होईल. सध्या पहिल्या स्थानावर २२७१ धावांसह मार्टिन गप्टील तर दुसऱ्या स्थानावर २१४० धावांसह ब्रेंडन मॅक्क्युलम आहे.
#३
भारताकडून टी२० सामन्यांत ५० विकेट्स घेणारा गोलंदाज होण्यासाठी जसप्रित बुमराला ९ विकेट्सची गरज. त्याने या मालिकेत या विकेट्स घेतल्या तर तो अश्विन (५२) पाठोपाठ सर्वाधिक टी२० विकेट्स घेणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी जाईल.
#४
भारताकडून परदेशात टी२० सामन्यात १००० धावा करणारा चौथा खेळाडू होण्यासाठी धोनीला १५७ धावांची गरज. यापुर्वी असा पराक्रम विराट कोहली (१२७९), रोहित शर्मा (१२६१) आणि सुरेश रैना (१०८१) यांनी केला आहे.
#५
आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात १५०० धावा करण्यासाठी सुरेश रैनाला १ तर एमएस धोनीला ५६ धावांची गरज. रैनाने ७३ सामन्यात १४९९ तर धोनीने ८९ सामन्यात १४४४ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–अनेक वर्ष अपुरे राहिलेले विराटचे स्वप्न उद्या होणार पुर्ण!
–अजिंक्य रहाणेने मिळवली पंतप्रधान नरेंद्र मोदींची शाब्बासकी
–अर्जून तेंडूलकरमुळे भारतीय संघात घराणेशाहीचे दर्शन! चाहत्यांचा हल्लाबोल