---Advertisement---

BCCIमध्ये महत्त्वाच्या पदांसाठी भरती सुरू, जाणून घ्या कोण करू शकतो अर्ज?

On: गुरूवार, ऑगस्ट 7, 2025 5:59 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) वेळोवेळी अनेक बदल करत असतो. सध्या बीसीसीआयने बंगळुरूमध्ये असलेल्या सेंटर ऑफ एक्सलन्स (COE) साठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे भारतीय क्रिकेट संरचनेला कोचिंग आणि क्रीडा विज्ञानाच्या दृष्टीने मदत होणार आहे. यासाठी बीसीसीआयने 3 महत्त्वाच्या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती बीसीसीआयच्या कोचिंग स्टाफला अधिक मदत करण्याच्या उद्देशाने केली जात आहे.

बीसीसीआयने बॅटिंग रेसिडेंट फॅकल्टी, बॉलिंग रेसिडेंट फॅकल्टी, याशिवाय क्रीडा विज्ञान आणि वैद्यकीय विभागासाठी भरती जाहीर केली आहे. रेसिडेंट बॉलिंग हे पद गोलंदाजी कोचिंगशी संबंधित असून, त्याद्वारे गोलंदाजीवर विशेष भर दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे बॅटिंग रेसिडेंट हे पद फलंदाजी कोचिंगसाठी असून, त्यामुळे फलंदाजांना सुधारण्यासाठी मदत मिळणार आहे.

याशिवाय, क्रीडा विज्ञान आणि वैद्यकीय पद खेळाडूंची फिटनेस, दुखापतीपासून बचाव आणि उपचार याकडे लक्ष देण्यासाठी असणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. सर्व पदांसाठी बेंगळुरू हे कार्यस्थळ असेल. उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे.

सर्व पदांसाठी वयोमर्यादा 60 वर्षांपेक्षा कमी असावी. इच्छुक उमेदवार बीसीसीआयच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन सहजपणे अर्ज करू शकतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---