इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रिस टोप्ली या हंगामातील पहिल्याच सामन्यात दुखापत झाली. ताज्या माहितीनुसार टोप्लीची ही दुखापत गंभीर असल्यामुळे तो मायदेशात परतला आहे. आयपीएल 2023च्या संपूर्ण हंगामातून त्याने माघार घेतल्याचेही समोर येत आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघांमध्ये झालेल्या सामन्यादरम्यान त्याला दुखापत झाली होती.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आयपीएल 2023 (IPL 2023) चा पहिला सामना पाच वेळचा आयपीएल चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्स सोबत खेळला. रविवारी (2 एप्रिल) रोजी हा सामना खेळला गेला होता. आरसीबीने होम ग्राउंड चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेला हा सामना 8 विकेट्स राखून नावावर केला. पण त्यांचा प्रमुख वेगवान गोलंदाज रिस टोप्ली (Reece Topley) याला मात्र दुखापत झाली. लाईव्ह सामन्यात टोप्लीचा खांदा निखळल्याचे सांगितले गेले होते. याच कारणास्तव गुरुवारी (6 एप्रिल) त्याने संपूर्ण हंगामातून माघार घेतल्याची पुष्टी करण्यात आली. आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक संजय बांगर (Sanjay Bangar) यांनी ही माहिती दिली.
आरसीबी आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात गुरुवारी लढत झाली. केकेआरने आपले होम ग्राउंड ईडन गार्डनवर आरसीबीला पराभूत केले. तब्बल 81 धावांच्या मोठ्या अंतराने आरसीबीला पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यादरम्यानच आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक संजय बांगल माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी बांगर म्हणाले, “टोप्ली आयपीएलमधून बाहेर पडला आहे. आता तो मायदेशातही परतला आहे. लवकरच त्याच्या पर्यायी खेळाडूची घोषणा केली जाईल.”
बांगरने यावेळी श्रीलंकेचा स्टार फिरकीपटू वानिंदु हसरंगा आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड यांच्या आगमनाची तारीख देखील सांगितले. प्रशिक्षकांनी सांगितल्यानुलास हसरंगा 10 एप्रिल, तर हेजलवूड 14 एप्रिलपर्यंत आरसीबीच्या कॅम्पमध्ये दाखल होऊ शकतात. जोस हेजलवूड मागच्या काही महिन्यांपासून दुखापतीचा सामना करत होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेत देखील याच कारणास्तव त्याला खेळता आले नाही. दुसरीकडे हसरंगा मात्र राष्ट्रीय संघासाठी खेळत असल्याने सुरुवातीच्या आयपीएल सामन्यांमधून त्याला माघार घ्यावी लागली. न्यूझीलंडविरुद्ध तिसरा टी-20 सामना 8 तारखेला खेळल्यानंतर हसरंगा भारतासाठी रवाना होईल. (Reece Topley ruled out from ipl 2023 rcb in search of replacement)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जिथं कमी तिथं आम्ही! KKRच्या 89 धावा असताना ‘त्यांनी’ गोलंदाजांना चोपलं, RCBला 205 धावांचं आव्हान
लेट पण थेट! KKRच्या गोलंदाजीपुढे बेंगलोरचा खेळ खल्लास, 81 धावांनी साकारला पहिला दमदार विजय