भारताची कुस्तीपटू रितिका हुडा हिला महिलांच्या 76 किलो फ्रीस्टाइल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरं जावे लागलं. 10 ऑगस्ट रोजी खेळल्या गेलेल्या या सामन्यात रितिकाला किर्गिस्तानची अव्वल मानांकित आणि दोन वेळची वर्ल्ड चॅम्पियनशिप पदक विजेती अपारी कैझीनं पराभूत केलं. सामना संपला तेव्हा स्कोअर 1-1 असा बरोबरीत होता. पण शेवटचा पॉइंट अपारी कैजीला देण्यात आला, ज्यामुळे ती विजेती बनली. रितिकाला आता रिपेचेजद्वारे कांस्यपदक जिंकण्याची संधी असेल. मात्र त्यासाठी अपारी कैजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचावी अशी प्रार्थना रितिकाला करावी लागेल.
रितिकाचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना अतिशय चुरशीचा होता. दोन्ही कुस्तीपटूंनी 1-1 गुण मिळवले. फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये सामन्यात आक्रमकता आणण्यासाठी पॅसिव्हिटीचा वापर केला जातो. हे तेव्हा घडतं, जेव्हा पहिल्या दोन मिनिटांत कोणतही कुस्तीपटू एकही गुण मिळवत नाही. अशा वेळी कमी आक्रमक असलेल्या कुस्तीपटूला 30 सेकंदांत एक गुण मिळवावा लागतो. जर त्या कुस्तीपटूनं तीस सेकंदात एकही गुण मिळवला नाही तर विरोधी पैलवानाला एक गुण मिळतो.
रितिका हुडानं पहिल्या हाफमध्ये पॅसिव्हिटीद्वारे 1 गुण घेतला. त्यानंतर उत्तरार्धात किर्गिस्तानच्या कुस्तीपटूनं पॅसिव्हिटीद्वारे 1 गुण घेतला. कुस्तीच्या नियमांनुसार, शेवटचा गुण मिळवणारा पैलवान जिंकतो. शेवटचा पॉइंट किरगिझस्तानच्या कुस्तीपटूनं मिळवला असल्यानं तिला विजेती घोषित करण्यात आलं.
रितिका हुडानं प्री-क्वार्टर फायनलमध्ये हंगेरियन कुस्तीपटू बर्नाडेट नागीचा 12-2 असा पराभव केला होता. ती तांत्रिक श्रेष्ठतेच्या आधारे जिंकली होती. तांत्रिक श्रेष्ठता म्हणजे, एखाद्या कुस्तीपटूनं 10 गुणांची आघाडी घेतली तर सामना तिथेच संपतो.
हेही वाचा –
नीरज चोप्राला आपल्या आवडीच्या मुलीशी करायचं आहे लग्न? आईचा मोठा खुलासा
ढोल-ताशा आणि डान्स, भारतीय हॉकी संघाचं मायदेशात अश्या पध्दतीनं स्वागत! पाहा VIDEO
पदकाच्या अगदी जवळ येऊन दूर राहिले! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानी राहणारे भारतीय खेळाडू