एसए लीगच्या (SA-20 2025) हंगामापूर्वी झालेल्या लिलावात दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर रीझा हेंड्रिक्स (Reeza Hendricks) हा सर्वात महागडा फलंदाज ठरला. त्याला एमआय केपटाऊनने (43 लाख रँड) सुमारे 2 कोटी 7 लाख रुपयामध्ये विकत घेतले. हेंड्रिक्सला जॉबर्ग सुपर किंग्सने लिलावापूर्वी सोडले होते, पण त्याने यूएईमध्ये आयर्लंडविरुद्ध सलग 2 अर्धशतके झळकावली. इंग्लिश वेगवान गोलंदाज रिचर्ड ग्लीसनला सनरायझर्स इस्टर्न केपने डरबन सुपरजायंट्स सोबतच्या खडतर सामन्यानंतर 2.3 लाख रँडमध्ये विकत घेतले.
डरबन सुपर जायंट्सने (Durban’s Super Giants) वेस्ट इंडिजचा (West Indies) वेगवान गोलंदाज शमार जोसेफला (Shamar Joseph) 425,000 रँडमध्ये विकत घेतले, जो आधी विकला गेला नव्हता. जोसेफ आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्ससाठी (Lucknow Super Giants) खेळतो. तो जानेवारीमध्ये पाकिस्तानच्या 2 कसोटी सामन्यांच्या दौऱ्यासाठी उपलब्ध असणार आहे. शमार जोसेफ (Shamar Joseph) 9 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या एसए (SA 20) सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. कारण 16 ते 28 जानेवारी दरम्यान वेस्ट इंडिजचा कसोटी दौरा असेल.
आगामी एसए-20 ला (SA-20 League) 9 जानेवारी 2025 रोजी सुरूवात होणार आहे. एसए-20 मध्ये ऐकूण 6 संघ खेळणार आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना 8 फेब्रुवारी 2025 रोजी खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
65 वर्षात तेंडुलकर, गावसकर, रोहितला जमलं नाही ते सरफराजनं करून दाखवलं!
147 वर्षाच्या इतिहासात भारताने पहिल्यांदाच बनवला असा रेकाॅर्ड, जो मोडीत काढणे अशक्य
“भारतासाठी खेळताना…” टी20 विश्वचषकापूर्वी स्टार खेळाडूचे मोठे वक्तव्य