महिला प्रीमियर लीग 2024 मध्ये 9 मार्चला गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात एक रोमांचक सामना खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सनं ७ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह मुंबई इंडियन्स WPL 2024 च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे.
या सामन्यात मुंबई संघाकडून कर्णधार हरमनप्रीत कौरची बॅट चांगलीच तळपली. हरमननं नाबाद 95 धावांची तुफानी खेळी खेळली. या खेळीच्या बळावर मुंबई संघ विजयी झाला. या सामन्यात शानदार फलंदाजी केल्यानंतर हरमनप्रीत कौरनं एक मोठा खुलासा केला आहे. हरमननं सांगितलं की मॅच झाल्यानंतर मॅच रेफरींनी तिची बॅट तपासली. मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीतनं सामन्यानंतर समालोचकांशी बोलताना याचा खुलासा केला.
हरमनप्रीत कौरनं गुजरात जायंट्सविरुद्ध चमत्कारिक खेळी खेळली. तिनं 48 चेंडूंचा सामना करत 95 धावा केल्या. एकेकाळी हरमनप्रीतची धावसंख्या 21 चेंडूत 20 होती, मात्र त्यानंतरच्या 27 चेंडूंमध्ये तिनं तब्बल 75 धावा ठोकल्या. हरमननं 10 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीनं 95 धावांची नाबाद खेळी खेळली.
या वादळी खेळीनंतर हरमनप्रीतनं खुलासा केला की, तिनं तिच्या सरावासाठी वापरण्यात येणाऱ्या बॅटनं फलंदाजी केली कारण त्याची पकड चांगली होती. सामन्यानंतर रेफरी तिची बॅट तपासण्यासाठी आले. हरमनप्रीतनं सांगितले की, जेव्हा आम्ही सराव करत होतो तेव्हा मी आज ज्या बॅटनं फलंदाजी केली त्याच बॅटनं खेळलो. ही बॅट माझ्या मॅच बॅटपेक्षा वेगळी होती, कारण माझ्या बॅटची पकड थोडी सैल होती. म्हणून मी माझ्या सराव बॅटनंच बॅटिंग करण्याचा विचार केला. “ते रेफरी माझ्या मागे लागलेत. ते मा्झी बॅट तपासत आहेत. जणू काही मी बॅटमध्ये काही टाकून आणलं आहे”, हरमनप्रीत हसत-हसत सांगते.
Match Referee Check Harmanpreet Kaur Bat.
This shows how Harmanpreet Kaur “HARD HITTING” the Ball.🔥🔥
🔁❤️
6,2,4,4,2,1,1,0,4,1,4,1,1,4,0,6,4,4,6,6,1,0,1,6,4,1,1
She scored 75 runs in the last 27 balls..!!#HarmanpreetKaur #MIvsGG #GGVSMI #WPL2024 #INDvENG #RohitSharma #INDvsENG pic.twitter.com/07a2aRhTQ5— Sports In Veins (@sportsinveins) March 9, 2024
गुजरात जायंट्सविरुद्धच्या विजयासह, मुंबई इंडियन्सचा संघ 10 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. WPL 2024 च्या गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्स 8 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर गुजरातचा संघ 2 गुणांसह तळाच्या स्थानी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाचं ‘न्यू ब्रॅन्ड ऑफ क्रिकेट’, ‘या’ 6 खेळाडूंनी काढली ‘बॅझबॉल’ची हवा!