भारतीय क्रिकेट संघाला येत्या १८ ऑगस्टपासून झिम्बाब्वे दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यात उभय संघात ३ सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय खेळाडू विश्रांती घेत आहेत. तर दुसरीकडे झिम्बाब्वेचा संघ बांगालेदशविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिका खेळण्यात व्यस्त आहे. या मालिकेतील दुसऱ्या वनडे सामन्यात ५ विकेट्सने विजय मिळवत झिम्बाब्वेने ३ सामन्यांची मालिका २-० ने खिशात घातली आहे. या सामन्यात झिम्बाब्वेकडून रेगिस चकाब्वा याने कर्णधार खेळी केली आहे. ही एकप्रकारे भारतीय संघासाठी धोक्याची घंटा असू शकते.
३४ वर्षीय चकाब्वा (Regis Chakabva) भारतीय संघाशी भिडण्यापूर्वी त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात (ZIM vs BAN) त्याने शानदार शतक झळकावले आहे. बांलगादेशच्या २९१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्याने १०२ धावांची खेळी केली आहे. या खेळीसाठी त्याने ७५ चेंडू खेळले आणि २ षटकार व १० चौकारही मारले. तब्बल १३६.०० च्या स्ट्राईक रेटने त्याने ही खेळी केली आहे.
याखेरीज चकाब्वाने (Regis Chakabva ODI Century) संघ सहकारी सिकंदर राजा याच्यासोबत मिळून २०१ धावांची दमदार भागीदारीही रचली आहे. सिकंदर ११७ धावा करत नाबाद राहिला. या दोघांच्या मोठ्या खेळींच्या जोरावर झिम्बाब्वेने ४७.३ षटकात बांगलादेशचे आव्हान पूर्ण केले.
One half of a matchwinning partnership, captain #RegisChakabva smashed his way to a glorious century!
Watch all the action from the Bangladesh tour of Zimbabwe LIVE, exclusively on #FanCode ???? https://t.co/CHsPGFv1Q0@ZimCricketv @BCBtigers#ZIMvBAN pic.twitter.com/afq4AbPqBD
— FanCode (@FanCode) August 8, 2022
रेगिस चाकाब्वाचे १४ वर्षांतील पहिलेच शतक
बांगलादेशविरुद्ध चकाब्वाने केलेले हे त्याच्या आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्दीतील पहिलेच शतक आहे. २००८ साली केन्या संघाविरुद्ध चाकाब्वाने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून ५४ वनडे सामने खेळूनही तो पहिले शतक झळकावण्याच्या प्रतिक्षेत होता. अखेर ५५ व्या वनडे सामन्यात त्याने आपल्या शतकाचा दुष्काळ संपवला. आता ५५ वनडे सामन्यात एका शतकासह त्याच्या खात्यात १०५७ धावा झाल्या आहेत.
भारतीय संघासाठी धोक्याची घंटा
झिम्बाब्वेचा कर्णधार चकाब्वाचे चांगल्या लयीत येणे नक्कीच भारतीय संघासाठी धोक्याची घंटा असेल. कारण बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर लगेचच १८ ऑगस्टपासून झिम्बाब्वेला मायदेशात भारताविरुद्ध वनडे मालिका खेळायची आहे. ही मालिका २२ ऑगस्ट रोजी संपेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय संंघात का होतायत सातत्याने बदल? कर्णधार रोहित शर्माने स्पष्टच सांगितले
आशिया चषकासाठी निवड होऊनही ‘या’ कारणामुळे केएल राहुलच्या जागेवर प्रश्नचिन्ह, अय्यरसाठी मात्र संधी!
जेव्हा बलाढ्य इंग्लंडविरुद्ध तळपली होती जम्बोची बॅट, कसोटीत केला होता अजब कारनामा






