आयपीएलच्या 17 व्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) विजेतेपदाचा मान मिळवला. रविवारी (26 मे) रोजी झालेल्या फायनल सामन्यात केकेआरनं सनरायझर्स हैदराबादचा (SRH) धुव्वा उडवला. तिसऱ्या वेळेस आयपीएलच्या ट्रॅाफीवरती त्यांचे नाव कोरलं. केकेआरच्या विजयानंतर त्यांचा सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज खूप भावूक झाला होता. सामन्यानंतर गुरबाज म्हणाला, “आज माझ्या आईचं स्वप्न पूर्ण झालं आहे.”
रहमानउल्ला गुरबाज विजयानंतर म्हणाला, “मला वाटते की माझी आई हा सामना पाहत असावी. ती आता ठीक आहे. मी सामन्यापूर्वी माझ्या आईशी बोललो. मी तिला विचारले की तुला काय हवं आहे? ती म्हणाली, काही नाही, फक्त जिंका.” त्यानंतर पुढे गुरबाज म्हणाला, “फिल सॉल्ट या हंगामात खरोखरच चांगला खेळला. आणि माझी अपेक्षा होती की, आता टी20 विश्वचषक येत आहे. मला त्यासाठी तयारी करायची होती. आणि फिल सॉल्टच्या जागी मला शेवटच्या 2 सामन्यांपासून संघात संधी मिळाली.”
गुरबाज म्हणाला की, “मी मिळालेल्या संधीच सोन केलं. मी दोन वेळा आयपीएल चॅम्पियन आहे, मी खूप नशीबवान आहे. जेव्हा तुम्ही 2 महिने कठोर मेहनत घेता. आणि ज्यावेळी असा निकाल येतो, तेव्हा हे विशेष आहे.”
आईची तब्येत बिघडल्यानं गुरबाज अफगाणिस्तानला रवाना झाला होता. परंतु प्ले-ऑफच्या आधी फिल सॉल्टला इंग्लंडला परतावे लागले. त्यामुळे गुरबाज त्याच्या आजारी आईला अफगाणिस्तानात सोडून प्ले-ऑफमधील सामने खेळण्यासाठी भारतात आला. आयपीएलमध्ये परतल्यानंतर तो म्हणाला होता की केकेआर हेदेखील त्याचं कुटुंब आहे. आणि या कुटुंबासाठी तो परतला आहे.
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक चौकार अन् षटकार मारणारे टॉप 5 खेळाडू, जाणून घ्या
ट्राॅफी जिंकल्यानंतर सुनील नारायणनं चक्क गौतम गंभीरला घेतलं उचलून! सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल
कोलकाताच्या विजयानंतर गौतम गंभीरची पहिली प्रतिक्रिया, गीतेचा श्लोक ट्वीट करत म्हणाला…