मुंबई, 3 फेब्रुवारी 2025: ड्रीम स्पोर्टस अजिंक्यपद स्पर्धेत रिलायन्स फाउंडेशन यंग चॅम्प्स(आरएफवायसी), ब्रदर्स स्पोर्टस असोसिएशन या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
कुपरेज फुटबॉल स्टेडियम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत रिलायन्स फाउंडेशन यंग चॅम्प्स (आरएफवायसी) संघाने कम्युनिटी फुटबॉल क्लब संघाचा 3-0 असा एकतर्फी पराभव करून शानदार सुरुवात केली. सामन्यात 12व्या मिनिटाला शादील ईके याने गोल करून संघाचे खाते उघडले. त्यानंतर 32व्या मिनिटाला शादील ईके याने आणखी एक गोल करून संघाची आघाडी 2-0 ने वाढवली. 83व्या मिनिटाला बदली खेळाडू निशाल याने गोल करून आरएफवायसी संघाला 3-0 अशा फरकाने विजय मिळवून दिला.
दुसऱ्या लढतीत ब्रदर्स स्पोर्टस असोसिएशन संघाने ठाणे सिटी एफसी संघाचा 5-0 असा धुव्वा उडवत धडाकेबाज सुरुवात केली. विजयी संघाकडून निबाश सिंग याने हॅटट्रिक कामगिरी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर, रोल्डन डिसिल्वा, तैनम मार्शिलाँग यांनी प्रत्येकी एक गोल करून त्याला साथ दिली.
महत्त्वाच्या बातम्या-
हे चार संघ यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये पोहोचतील, माजी क्रिकेटपटूचा मोठा अंंदाज
कर्णधार सूर्याची कामगिरी अतिउत्तम, पण फलंदाज म्हणून लज्जास्पद रेकाॅर्ड, पाहा आकडेवारी
टीम इंडियाच्या या खेळाडूंना विश्रांती नाही, टी20 नंतर आता वनडेतही खेळणार