बुधवारी (०४ ऑगस्ट) कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मधील आपला शेवटचा साखळी फेरी सामना खेळताना भारताने बार्बाडोसला १०० धावांच्या फरकाने पराभूत केले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला निर्धारित २० षटकात ४ विकेट्सच्या नुकसानावर १६२ धावाच करता आल्या. प्रत्युत्तरात बार्बाडोसचा संघ २० षटकात ८ विकेट्स गमावत ६२ धावाच करू शकला. बार्बाडोसला इतक्या कमी धावसंख्येवर रोखण्यात भारताच्या वेगवान गोलंदाज रेणुका सिंग हिचा मोठा वाटा राहिला. तिने या सामन्यात भेदक गोलंदाजी करत मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
बार्बाडोसविरुद्धच्या (INDvsBAR) ‘करा अथवा मरा’ सामन्यात भारताच्या १६३ धावांचा बचाव करताना रेणुका सिंगने (Renuka Singh) पावरप्लेमध्ये उत्तम स्पेल टाकला. तिने ४ षटके फेकताना केवळ १० धावा देत ४ विकेट्स घेतल्या. यात बार्बाडोसच्या घातक सलामीवीर डिएंड्रा डॉटिन आणि कर्णधार हिली मॅथ्यूज यांच्या विकेट्सचाही समावेश होता. रेणुकाने सामन्यातील तिसऱ्याच चेंडूवर डिएंड्राला शून्यावर त्रिफळाचीत केले. त्यानंतर कर्णधार मॅथ्यूजला ९ धावांवर झेलबाद केले.
पुढे कायसिया नाईट (३ धावा) आणि आलियाह ऍलेन (शून्य धावा) यांच्या विकेट्स काढल्या. अशाप्रकारे तिने पुन्हा एकदा एकाच सामन्यात ४ विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कॉमनवेल्थ गेम्समधील पहिल्याच सामन्यात तिने १८ धावा देत ४ विकेट्स घेतल्या होत्या. आता याच पराक्रमाची पुनरावृत्ती करत तिने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. ती अशी पहिली महिला गोलंदाज बनली आहे, जिने कॉमनवेल्थ गेम्समध्ये २ वेळा ४ विकेट्स घेतल्या आहेत.
याबरोबरच ती ती पहिली महिला वेगवान गोलंदाज (Renuka Singh Record) बनली आहे, जिने एकाच मालिकेत २ वेळा ४ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत.
The Swing Queen Renuka Singh Thakur 😍🙌#TeamIndia pic.twitter.com/fhU4MtMgrT
— Female Cricket (@imfemalecricket) August 3, 2022
दरम्यान भारतीय संघाने बार्बाडोसवर १०० धावांच्या फरकाने विक्रमी विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली आहे. आता उपांत्य फेरीत त्यांचा सामना न्यूझीलंड किंवा इंग्लंड पैकी एका संघासोबत होईल. जर भारतीय संघाला उपांत्य सामना जिंकता आला, तर ते थेट अंतिम सामन्यात प्रवेश करतील. याउलट जर त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तर कांस्य पदक जिंकण्याची संधी भारतीय संघाकडे असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
रेणुकाच्या अफलातून गोलंदाजीने विरोधी संघाच्या दांड्या गुल! एकाच व्हिडिओमध्ये पाहा विकेट्सचा थरार
आता सुरू होणार मेडल्स जिंकण्यासाठीची अस्सल शर्यत, भारतासह ‘या’ ४ संघांचा सेमी फायनलमध्ये प्रवेश
WIvsIND: रोहित-द्रविडच्या डोळ्यात खुपतोयं ‘हा’ खेळाडू, बनला आहे टीम इंडियाची मोठी कमजोरी