19 वर्षाखालील भारत विरुद्ध श्रीलंका संघात मंगळवारी (17 जुलै) कोलंबो येथील नॉडेस्क्रीप्ट क्रिकेट क्लबच्या मैदानावर पहिला कोसोटी सामना सुरु झाला आहे.
या सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा पुत्र अर्जुनने आपल्या 12 व्या चेंडूवर बळी मिळवत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार आगमन केले आहे.
या चार दिवसीय कसोटी सामन्यात श्रीलंका संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
भारतीय कर्णधार अनुज रावतने भारताकडून पहिले षटक टाकण्यासाठी अर्जुन तेंडूलकरला पाचारण केले.
आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत अर्जुन तेंडुलकर तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर श्रीलंकन सलामीवीर कमिल मिशाराला पायचीत करत भारतासाठी आणि त्याचा वैयक्तिक पहिला बळी मिळवला.
Arjun Tendulkar ( son of @sachin_rt) traps the batsman LBW to pick his maiden wicket in Youth Internationals
Video courtesy- Srilanka cricket pic.twitter.com/DBcapjhovA— Nibraz Ramzan (@nibraz88cricket) July 17, 2018
शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा श्रीलंकेने 53 षटकात 5 बाद 206 धावा केल्या होत्या. यामध्ये हर्ष त्यागीने तीन तर अर्जुन तेंडुलकर आणि मोहित जंग्राने प्रत्येकी एक बळी मिळवला होता.
19 वर्षाखालील भारतीय संघ श्रीलंके विरुद्ध दोन कसोटी आणि पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.
जून महिन्यात 19 वर्षाखालील भारतीय संघात अर्जुन तेंडुलकरची निवड झाल्यानंतर अर्जुन सहित सचिन तेंडुलकर आणि भारतीय निवड समितीवर मोठ्या प्रमाणात टिका झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
-भावनिक विराट कोहलीने मानले भारतीय चाहत्यांचे आभार
-कुलदीप यादवला निष्प्रभ ठरवण्यासाठी आम्ही सज्ज- मार्क वुड