आयपीएल 2024चा हंगाम होऊन काही महिने संपले. आयपीएल 2024चा विजेता कोलकाता नाईट रायडर्स संघ ठरला. कोलकाताने तिसऱ्यांदा आयपीएलची ट्राॅफी उंचावली. 2 वेळेस गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता चॅम्पियन बनला, तर 2024मध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली केकेआरनं विजेतेपदाचा मान मिळवला. तत्पूर्वी रिपोर्ट्सनुसार एलएसजीचा कर्णधार केएल राहुल आरसीबी संघात परत जाण्याची शक्यता आहे.
केएल राहुलनं (KL Rahul) 2022च्या आयपीएल हंगामात लखनऊ सुपर जायंट्ससोबत 3 वर्षाचा करार केला होता. तो करार आता संपुष्टात आला आहे. स्पोर्टकीडाच्या रिपोर्ट्सनुसार केएल राहुल (KL Rahul) एलएसजीचा 3 वर्षाचा करार संपवून आयपीएल 2025पूर्वी आरसीबीच्या ताफ्यात सामील होण्याची शक्यता आहे. तर आरसीबी कर्णधार फाफ डुप्लेसीसनंतर तो आरसीबीची धुरा सांभाळताना दिसेल. असे या रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे.
🚨 REPORTS 🚨
KL Rahul is likely to end his three-year association with Lucknow Super Giants and join Royal Challengers Bangaluru ahead of the IPL 2025. 🏏🔴
He is likely to be the next RCB captain succeeding Faf du Plessis 🧢#Cricket #KLRahul #RCB #IPL pic.twitter.com/qqlsAxpycd
— Sportskeeda (@Sportskeeda) July 20, 2024
आयपीएल 2022 पासून केएल राहुल (KL Rahul) लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघाची धुरा सांभाळत आहे. राहुलच्या नेतृत्वाखाली एलएसजीनं प्लेऑफसाठी 2 वेळा क्वालिफाय केलं आहे. तर आयपीएल 2024मध्ये एलएसजी संघ प्लेऑफसाठी क्वालिफाय करु शकला नाही.
केएल राहुलनं (KL Rahul) एलएसजीसाठी 2024च्या आयपीएलमध्ये 14 सामने खेळले. त्यामध्ये त्यानं 520 धावा ठोकल्या. यादरम्यान त्यानं 4 अर्धशतकंही झळकावली. या हंगामात त्याची फलंदाजी सरासरी 37.14 राहिली तर स्ट्राईक रेट 136.13 राहिला. आयपीएल 2024मध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 82 राहिली आहे. तर आयपीएलच्या इतिहासात त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 132 आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत ‘किंग’ कोहली रचणार इतिहास?
भारतीय संघाचे अच्छे दिन येणार? स्पेनच्या दिग्गज खेळाडूची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती
एकेकाळी ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर होता भारतीय फुटबॉल संघ! पदक अगदी थोडक्यात हुकलं