भारतीय क्रिकेट बोर्ड आपला डीआरएसला असलेला विरोध कमी करत असून आता २०१८मध्ये आपल्याला आयपीएलमध्ये या पद्धतीचा अवलंब केला दिसू शकतो.
टाइम्स ऑफ इंडियामधील एका वृत्तप्रमाणे बीसीसीआयने आयसीसी एलिट पॅनलमध्ये नसलेल्या भारतातील टॉप १० पंचांची एक कार्यशाळा विशाखापट्टणम येथे घेतली आहे.
“असे पहिल्यांदाच झाले आहे की डीआरएससाठी बीसीसीआयने पंचांची कार्यशाळा घेतली आहे. तंत्रज्ञान हे येत्या काळात नक्कीच पंचांच्या निर्णयात मोठी भूमिका पार पाडेल. त्यामुळे पंचांमध्ये याबद्दल जागृती करण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली. आयपीएलमध्ये याचा वापर करावा अथवा नाही याचा कोणताही निर्णय झाला नाही. परंतु अजून बराच वेळ असल्यामुळे हा निर्णय होऊ शकतो. ” असे एका सूत्राने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले आहे.
असे जर झाले तर याचा नक्कीच फायदा खेळाडू तसेच खेळाला होईल.