---Advertisement---

मोठी बातमी: आरसीबीच्या विजयोत्सवादरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमजवळ 11 जणांचा मृत्यू! वाचा सविस्तर

On: बुधवार, जून 4, 2025 7:17 PM
---Advertisement---

मंगळवारी (3 जून) रोजी आयपीएल 2025चा फायनल सामना खेळला गेला. त्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज संघ आमने-सामने होते. (RCB vs PBKS Final) या सामन्यात आरसीबीने पंजाबचा 6 धावांनी धुव्वा उडवत आयपीएल 2025च्या ट्राॅफीवर आपले नाव कोरले. त्यामुळे या संघाच्या स्वागतासाठी संपूर्ण बंगळुरू शहर सज्ज आहे. बुधवारी (4 जून) सायंकाळी चिन्नास्वामी स्टेडियम येथे होणाऱ्या स्वागत समारंभासाठी मोठी गर्दी जमली आहे. या गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृ’त्यू झाला असून, त्यामध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे.

तब्बल 18 वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर आयपीएल जिंकल्यामुळे आरसीबी संघाचे बेंगलोरमध्ये स्वागत करण्यात येत होते. या स्वागतासाठी खूप मोठ्या संख्येने चाहते विधान सौधा ते चिन्नास्वामी स्टेडियम या मार्गावर जमा झाले. तसेच, स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. त्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे तिथे चाहत्यांची धावपळ झाली. या गोंधळात चेंगराचेंगरी वातावरण तयार झाले. यादरम्यान वृत्तानुसार तब्बल 11 लोकांचे प्राण गेल्याचे सांगण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---