पाचगणी । रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल 16 वर्षाखालील नॅशनल सिरीज् टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात रेश्मा मारूरी, पवित्रा रेड्डी, आर्या पाटील, विपाशा मेहरा, स्वरदा परब, रेनी शर्मा या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात पहिल्या फेरीत क्वालिफायर रेश्मा मारूरी हिने वैष्णवी आडकरचा टायब्रेकमध्ये 4-6, 7-6(4), 7-6(3)असा संघर्षपूर्ण पराभव केला.
पवित्रा रेड्डीने मधुरिमा सावंतवर 6-2, 7-6(4)अशा फरकाने विजय मिळवला. अपूर्वा वेमुरीने निर्मयी सुरापूरचा 6-1, 6-3असा तर, आर्या पाटीलने संजुक्ता विक्रमचा 7-5, 6-1असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.
विपाशा मेहराने रिया वाशीमकरचे आव्हान 6-4, 6-1असे संपुष्टात आणले. स्वरदा परब हिने रिद्धी काकर्लामुदीला 6-1, 6-2असे नमविले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी: 16 वर्षाखालील मुली:
कोतिष्ठा मोडक वि.वि.मृणाल कुरळेकर 6-2, 6-3;
श्रेष्ठा पी वि.वि.अमुल्या गणपावरापू 6-2, 6-4;
पवित्रा रेड्डी वि.वि.मधुरिमा सावंत 6-2, 7-6(4);
रेश्मा मारूरी वि.वि.वैष्णवी आडकर 4-6, 7-6(4), 7-6(3);
अपूर्वा वेमुरी वि.वि.निर्मयी सुरापूर 6-1, 6-3;
आर्या पाटील वि.वि.संजुक्ता विक्रम 7-5, 6-1;
सुहिता मारूरी वि.वि.निवेदिता शंकर 6-4, 6-0;
वेदा रानबोथु वि.वि.आर्णी रेड्डी 6-3, 5-7, 6-1;
विपाशा मेहरा वि.वि.रिया वाशीमकर 6-4, 6-1;
रेनी शर्मा वि.वि.अभया वेमुरी 6-3, 7-5;
स्वरदा परब वि.वि.रिद्धी काकर्लामुदी 6-1, 6-2.