१५ व्या जायंट स्टारकेन एमटीबी राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेचा तिसरा दिवस महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकच्या संघाने गाजवला . दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत झाली आणि दोन संघानी प्रत्येकी ५ पदके तिसऱ्या दिवशी मिळवली. (दोन्ही संघ २ सुवर्ण २ रजत आणि १ कास्य)
पुण्यातील सनीस वर्ल्ड येथे चालू असलेल्या या स्पर्धेत आज तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या मानसी कमलाकरला मुलींच्या क्रॉस कंट्री सब जुनियर ( १५-१६ वर्षे) गटातसुवर्ण पदक मिळवले. मानसीने १४. ७ किमीचे अंतर १ तास १६ मिनिटे १५.२०२ सेकंदात पार पाडले. याच प्रकारात महाराष्ट्राचीच सिद्धी शिर्के रजत पदकाचीमानकरी ठरली. तिने हे अंतर १ तास १७ मिनिटे ३९.२१० सेकंदात पूर्ण केले.
महिलांच्या एलिट गटात (१९ वर्षांवरील ) सशस्त्र सेना बलाच्या पूनम राणा ने १ तास ३१ मिनिटे आणि ३५.१४७ सेकंदात १४.७ किमीचे अंतर पूर्ण करून सुवर्णपदकमिळवले. या प्रकारात महाराष्ट्राच्या प्रणिता सोमणने कास्य पदकाची कमाई केली. तिने हे अंतर १ तास ३५ मिनिटे ४८.२४० सेकंदात पूर्ण केले.
मुलींच्या क्रॉसकंट्री युथ प्रकारात महाराष्ट्राच्या प्रणिता सोमणने सुवर्ण पदक मिळवले. तिने १९.६ किमीचे अंतर १ तास ३२ मिनिटे ५९.२०८ सेकंदात पूर्ण केले. याप्रकारात कर्नाटकच्या दानम्मा गौरव आणि सौम्या अंतपुरने अनुक्रमे रजत आणि कास्य पदक मिळवले.
क्रॉसकंट्री मेन एलिट प्रकारात कर्नाटकच्या किरणकुमार राजू ने सुवर्ण पदक मिळवले. २९.४ किमीचे अंतर किरणने १ मिनिटे ३५ मिनिटे आणि १०.९४८ सेकंदात पूर्णकेले. या प्रकारात भारतीय सेनेच्या सूरज मलिक आणि आशिष के ने अनुक्रमे रजत आणि कास्य पदक मिळवले.