आंतरराष्ट्रीय लेझर रन स्पर्धेत चमकदार कामगिरी : मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन आॅफ इंडियातर्फे आयोजन
पुणे : आर्या चव्हाण, नंदिनी मेणकर, यश भुजबळ, प्रसाद भार्गव, ओंकार रतनोजी, एम. कल्याणी यांनी आंतरराष्ट्रीय लेझर रन स्पर्धेत आपापल्या गटात पहिला क्रमांक पटकावला. मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन आॅफ इंडियातर्फे आयोजित ही स्पर्धा सणस क्रीडांगणावर सुरू आहे. यावर्षी ५ ते ७ आॅक्टोबर दरम्यान दक्षिण अफ्रिकेतील केपटाउन येथे होणाºया दुसºया जागतिक लेझर रन अजिंक्यपद स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड या स्पर्धेतून होणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या हस्ते झाले. यावेळी मुक्ता टिळक, महाराष्ट्र आॅलिम्पिक असोसिएशनचे सचिव बाळासाहेब लांडगे, नगरसेवक सम्राट थोरात, आरती कोंढरे, मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष सुनील पूर्णपत्रे, मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन आॅफ इंडियाचे क्रीडा संचालक विनय मराठे आदी उपस्थित होते.
निकाल : ११ वर्षांखालील मुले (८०० मी. धावणे आणि ५ मी. अंतरावरून नेमबाजी) : आर्या चव्हाण – ४ मि. ४१.२२ से., वेदांत गोखल- ४ मि. ४१.२३ से., पार्थ मायदेव – ४ मि. ४८.२२ से., अर्जुन देशमुख -४ मि. ५०.५६ से., अदीप वाघ- ४ मि. ५२.५६ से., अर्जुन आडकर ४ मि. ५३ से. मुली : नंदिनी मेणकर- ५ मि. १३ से., श्रेया मालुसरे- ५ मि. २२ से., विधिका परमार – ५ मि. ३१ से., पानया खट्टर – ५ मि. ३८ से., मुद्दमा दिविजा – ५ मि. ५५.४५ से., ऋजुता राजज्ञा -५ मि. ५५ से.
१३ वर्षांखालील मुले (१२०० मी. धावणे आणि ५ मी. अंतरावरून नेमबाजी) : यश भुजबळ -६ मि. ५१ से., अथर्व बोगम -७ मि. ८ से., श्लोक पायगुडे -७ मि. २१ से., अमितसिंग ७ मि. २१.२२ से., के. दिव्यांश – ७ मि. ५३ से., अथर्व धारणे -७ मि. ५४ से. मुली : सी. दिव्या -६ मि. ५३ से., श्रुती गायकवाड-७ मि. १३ से.,अनन्या नामदे- ७ मि. १४ से., जुई घम -७ मि. १५ से., सायली गांजळे – ७ मि. १८ से., मुग्धा वाव्हळ – ७ मि. १९ से.
१५ वर्षांखालील मुले (१६०० मी. धावणे आणि ७ मी. अंतरावरून नेमबाजी) : प्रसाद भार्गव- ८ मि. ५१ से., एन. पवनकुमार – ९ मि. ७ से., आकाश जाधव – ९ मि. ११ से., एस. भार्गव – ९ मि. १९ से., यश बाफना -९ मि. २२ से., अमोघ रवीकांतीवार- ९ मि. ३६ से. मुली : मैत्राली भंडारी – ११ मि. ८ से., सायना ढोका – ११ मि. ५१ से., टी. बिंदू प्रसन्ना १२ मि. ६ से., के. सहिती -१४ मि. २३ से.
१७ वर्षांखालील मुले (१६०० मीटर धावणे आणि १० मी. अंतरावरून नेमबाजी) : ओंकार रतनोजी -८ मि. ३५ से., पार्थ खराटे – ८ मि. ३९ से., दिशांक सैनी-९ मि. १३ से., दीपक चौधरी -९ मि. ३७ से., धनंजय निकम – १० मि., के. नितीन कश्यप – १० मि. ००.२ से. मुली : एम. कल्याणी – १० मि. ३० से., वेमुला सुप्रिया -११ मि. २३ से., रिचा शर्मा – १३ मि. २९ से., मादा निहारिका – १४ मि. ०३ से.