क्रिकेटच्या सर्व प्रकारात कसोटी क्रिकेट हा सर्वात आव्हानात्मक क्रिकेटचा प्रकार मानला जातो. खेळाडूंची खरी परीक्षा या प्रकारातच होते. जगातील प्रत्येक क्रिकेट खेळाडूचे देशाच्या कसोटी संघात स्थान मिळवण्याचे स्वप्न असते. परंतु, हे स्वप्न पूर्ण करणे सोपे नाही. अनेक खेळाडू मिळालेल्या संधीचे सोनं करून, संधीचा पुरेपूर फायदा घेत सातत्याने चांगली कामगिरी करत कसोटी संघात आपले स्थान पक्के करतात. तेच दुसरीकडे काही खेळाडू मिळालेल्या संधीचा पूर्ण फायदा घेण्यास अपयशी होतात. याच कारणाने अनेक खेळाडू कसोटी क्रिकेट मध्ये त्यांची कारकीर्द लांबवू शकत नाहीत.
भारतीय संघातही असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये सुरूवातीला चांगले प्रदर्शन करत मोठ्या प्रवासाच्या दिशेने वाटचाल केली होती, परंतु मध्यंतरी त्यांच्या काही खराब प्रदर्शनामुळे त्यांना संघातून बाहेर काढण्यात आले. त्या खेळाडूंनी चांगली फलंदाजी करत आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मागे रांगेत अनेक मोठ्या नावांची यादी असल्यामुळे त्यांना काही सामन्यातील खराब कामगिरीमुळे संघातून बाहेर पडावे लागले. भारतीय संघात असे अनेक खेळाडू सोबत झाले आहे. या लेखात अशाच 3 मोठ्या खेळाडूंचा उल्लेख केला आहे जे आता कधीच टेस्ट क्रिकेटमध्ये परतणार नाहीत.
मुरली विजय: मुरली विजयने कसोटीमध्ये पदार्पण केल्यानंतर अनेक वर्षे ताबडतोड फलंदाजी करत चांगले प्रदर्शन केले. तो 2018 मधील ऑस्ट्रेलिया दौर्यापर्यंत भारतीय संघात होता. त्यावेळी मुरली विजय खराब फार्मात असल्यामुळे तो फलंदाजीत विशेष कामगिरी करण्यात अपयशी ठरला. यामुळे त्याला संघातून बाहेर काढण्यात आले. मुरली विजयने खेळलेल्या 61 सामन्यांत चार हजार धावा करत 12 शतकेही झळकावली आहेत. त्याला बाहेर केल्यानंतर त्याच्या जागी अनेक नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली. 37 वर्षीय मुरली विजयला आता संघात स्थान मिळू शकणार नाही.
करुण नायर: इंग्लंडविरुद्ध चेन्नईत खेळलेल्या सामन्यांत या खेळाडूने त्रिशतक लगावत क्रिकेट जगतात खळबळ माजवली होती. यानंतर सर्वांना हा खेळाडू दीर्घ काळासाठी भारतीय संघात राहील असे वाटत होते, परंतु असे झाले नाही. त्रिशतकी खेळी केल्यानंतर त्याला एकही मोठी खेळी करता आली नाही. आपल्या छोट्या कारकीर्दी दरम्यान करून नायरने 374 धावा बनवल्या. त्यात 303 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. करुण आता 29 वर्षांचा झाला असून भविष्यात तो कसोटी संघात परतण्याची शक्यता काही दिसत नाही.
शिखर धवन: पहिल्याच कसोटी सामन्यात शतकी खेळी करत शिखरने आपल्या कारकिर्दीची जबरदस्त सुरुवात केली होती. शिखरने बराच काळ संघासाठी ओपनरची भूमिका बजावत अनेक चांगल्या खेळी केल्या. 2018 मधील इंग्लंड दौर्यात खराब फॉर्म मुळे त्याला संघातून बाहेर काढण्यात आले. शिखर आता 35 वर्षाचा झाला आहे आणि संघात ओपनरची जागा रिकामी नाही. यानंतर त्याला संधी मिळणे अशक्य आहे. कारण ओपनरच्या जागेसाठी केएल राहुल, रोहित शर्मा, शुभमन गिल, पृथ्वी शॉ इत्यादि खेळाडू स्पर्धेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
दिल्ली आणि अहमदाबादमध्ये आयपीएलचे सामने खेळवण्याचा हट्ट बीसीसीआयला भोवला?
महिलांच्या क्रिकेटबाबत दुजाभाव करत असल्याचा आरोप, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने दिले हे उत्तर
या मैदानावर होतील भारत विरूद्ध श्रीलंकेचे सामने