आयपीएल 2026 (IPL 2026) साठीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. सर्व संघांनी कंबर कसली आहे. येणाऱ्या हंगामापूर्वी अनेक मोठे बदल आणि उलथापालथ होणार आहेत. काही संघांचे कर्णधारही बदलले जाण्याची शक्यता आहे. आयपीएल 2026 मिनी ऑक्शनही होणार आहे, ज्यामध्ये भारतासह जगभरातील अनेक स्टार खेळाडूंचे भविष्य ठरणार आहे. पण हा मिनी ऑक्शन नेमका कुठे होणार? याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, आयपीएल 2026 चा मिनी ऑक्शन भारतात नव्हे तर परदेशात होण्याची शक्यता आहे. सध्या भारतात लग्नांचा हंगाम सुरू असल्यामुळे ऑक्शनचं ठिकाण गल्फ देशांपैकी एखाद्या देशात हलवले जाऊ शकते. असे मानले जात आहे की ओमान किंवा कतारमध्ये मिनी ऑक्शनचं आयोजन होऊ शकतं.
मागच्या वेळी, म्हणजे आयपीएल 2025 चं मिनी ऑक्शन सौदी अरेबियातील जेद्दा शहरात पार पडलं होतं.
जरी बीसीसीआयला ऑक्शन भारतातच घ्यायचं असेल, तरी लग्न आणि सणांच्या हंगामामुळे बोर्डाने या वेळी ऑक्शन परदेशात घेण्याचा विचार केला आहे.
मिनी ऑक्शनचं आयोजन डिसेंबर 2025 मध्ये होण्याची शक्यता आहे. बीसीसीआय 15 नोव्हेंबरपूर्वी ऑक्शनची तारीख जाहीर करू शकते, कारण सर्व फ्रँचायझींना त्या आधी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी सादर करायची आहे.
राजस्थान रॉयल्सचा अनेक वर्षांपासून कर्णधार असलेला संजू सॅमसन (Sanju Samson) या वेळी नव्या फ्रँचायझीत दिसू शकतो, कारण त्याने राजस्थान सोडण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे
त्याचप्रमाणे के.एल. राहुल दिल्ली कॅपिटल्सचा निरोप घेऊन कोलकाता नाईट रायडर्स (KKR) मध्ये दिसू शकतो. रिपोर्टनुसार KKR त्याला आपल्या संघात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
याशिवाय मिचेल स्टार्क (DC), वानिंदु हसरंगा (RR), मयंक यादव (LSG) आणि वेंकटेश अय्यर (KKR) यांसारखे काही खेळाडूही रिलीज केले जाऊ शकतात.






