पाचगणी । रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या रवाईन हॉटेल अखिल भारतीय मानांकन पुरुष व महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष गटात जयेश पुंगलिया, फैजल कुमार, इशाक इकबाल, कुणाल वझिरानी यांनी तर महिला गटात नताशा पल्हा, नित्याराज बाबुराज, अविष्का गुप्ता, हुमेरा शेख या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
रवाईन हॉटेल, पाचगणी येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेतएकेरीत उपांत्यपूर्व फेरीत महिला गटात सहाव्या मानांकित झारखंडच्या अविष्का गुप्ताने चौथ्या मानांकित पश्चिम बंगालच्या यूब्रानी बॅनर्जीचा टायब्रेकमध्ये ४-६, ७-६(७), ६-४असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. अव्वल मानांकित नताशा पल्हा हिने अनुशा कोंडावेत्तीचा ६-१, ७-५असा पराभव करून आगेकूच केली. दुसऱ्या मानांकित तेलंगणाच्या हुमेरा शेखने काल मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय मिळविणाऱ्या महाराष्ट्राच्या सालसा आहेरचा ६-४, ६-३ असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
पुरुष गटात उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राच्या चौथ्या मानांकित जयेश पुंगलियाने आठव्या मानांकित दिल्लीच्या अनुराग नेनवानीचा ६-३, ७-५ असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. राजस्थानच्या अव्वल मानांकित फैजल कुमारने फरदीन कुमारचा ६-३, ६-३ असा पराभव केला. तिसऱ्या मानांकित पश्चिम बंगालच्या इशाक इकबालने तेलंगणाच्या सिवादीप कोसाराजूचा ६-२, ६-३असा सरळ सेटमध्ये पराभव करून आपले आव्हान कायम राखले.
दुहेरीत पुरुष गटात जयेश पुंगलियाने कुणाल वझिरानीच्या साथीत अंशु कुमार भुयान व चिन्मय प्रधान यांचा ६-४, ६-३असा पराभव केला. रोहन भाटिया व अरमान भाटिया यांनी एस रवी शंकर व रित्विक आनंद या जोडीवर ६-२, ६-३असा विजय मिळवला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी: पुरुष गट: उपांत्यपूर्व फेरी: फैजल कुमार(१)वि.वि.फरदीन कुमार ६-३, ६-३;जयेश पुंगलिया(४)वि.वि. अनुराग नेनवानी(८)६-३, ७-५; इशाक इकबाल(३)वि.वि.सिवादीप कोसाराजू ६-२, ६-३; कुणाल वझिरानी वि.वि.परमवीर बाजवा(२)६-३, ३-०सामना सोडून दिला;
महिला गट: नताशा पल्हा(१)वि.वि.अनुशा कोंडावेत्ती ६-१, ७-५; नित्याराज बाबुराज(३)वि.वि.सौम्या विज(७)६-४, ६-१; अविष्का गुप्ता(६) वि.वि.यूब्रानी बॅनर्जी(४)४-६, ७-६(७), ६-४; हुमेरा शेख(२)वि.वि.सालसा आहेर ६-४, ६-३;
दुहेरी: पुरुष गट: रोहन भाटिया/अरमान भाटिया वि.वि.एस रवी शंकर/रित्विक आनंद ६-२, ६-३; निकित रेड्डी/ऋषी रेड्डी वि.वि.नितीन गुंडूबोईना/सिवादीप कोसाराजू ६-४, ६-२; जयेश पुंगलिया/कुणाल वझिरानी वि.वि.अंशु कुमार भुयान/चिन्मय प्रधान ६-४, ६-३; फैजल कुमार/फरदीन कुमार पुढे चाल वि.अनुराग नेनवानी/परमवीर बाजवा;
महिला गट: हुमेरा शेख/सालसा आहेर वि.वि.युब्रानी बॅनर्जी/नताशा पल्हा ७-६(५), ६-३; अपूर्वा एसबी/ अविष्का गुप्ता वि.वि.वैशाली ठाकूर/अमिशा पटेल ६-३, ६-१; आकांक्षा नित्तूरे/कोसामी सिन्हा वि.वि.माहरुख कोकणी/शर्मीन रिझवी ६-०, ६-२;नित्याराज बाबुराज/सौम्या विज वि.वि.शितल शेट्टी/स्वरदा परब ६-१, ६-४