पाचगणी । रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या रवाईन हॉटेल अखिल भारतीय मानांकन पुरुष व महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष गटात परमवीर सिंग, जयेश पुंगलिया, अनुराग नेनवानी, धीरज केएस, अंशुमन गुलिया यांनी तर, महिला गटात स्वरदा परब, नक्षत्रा कांकरिया या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला.
रवाईन हॉटेल, पाचगणी येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पुरुष गटात जयेश पुंगलिया याने येशवंत लोगनाथचा ६-०, ६-० असा एकतर्फी पराभव केला. धीरज केएस याने नितीन गुंडूबोइनावर टायब्रेकमध्ये ३-६, ६-३, ७-६(४)असा विजय मिळवला. अंशुमन गुलियाने रित्विक राजशेखरचे आव्हान ३-६, ६-३, ७-६(२)असे मोडीत काढले. अनुराग नेनवानीने विक्रम धनंजयला ६-२, ६-२असे पराभूत केले.
महिला गटात महाराष्ट्राच्या स्वरदा परबने अभिशिक्ता वर्माचा टायब्रेकमध्ये ६-७(६), ६-२, ६-१असा पराभव करून मुख्य फेरी गाठली. नक्षत्रा कांकरिया हिने ज्योत्स्ना मदानेला ६-१, ६-३असे पराभूत करून आगेकूच केली.
स्पर्धेतील खेळाडूंची मानांकन यादी आज जाहीर करण्यात आली. पुरुष गटात राजस्थानच्या फैजल कुमारला अग्रमानांकन देण्यात आले. तर दिल्लीच्या परमवीर सिंग व पश्चिम बंगालच्या इशाक इकबाल यांना अनुक्रमे दुसरे व तिसरे मानांकन देण्यात आले. महाराष्ट्राच्या जयेश पुंगलियाला चौथे मानांकन देण्यात आले. महिला गटात गोव्याच्या नताशा पल्हाला अव्वल मानांकन देण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पुरुष गट: पहिली पात्रता फेरी:
परमवीर सिंग(१)वि.वि.टी. कुमार विनय(१४)६-१, ६-२
जयेश पुंगलिया(२)वि.वि.येशवंत लोगनाथ(११)६-०, ६-०;
अनुराग नेनवानी(३)वि.वि.विक्रम धनंजय(१३)६-२, ६-२;
फरदीन कुमार(४)वि.वि.आलोक आराध्या(१०)७-५, ६-४;
धीरज केएस(५)वि.वि.नितीन गुंडूबोइना(१५)३-६, ६-३, ७-६(४);
ओसामा शेख(६)वि.वि.रिषभ रवीकिरण(१२)६-२, ६-२;
अंशुमन गुलिया(७)वि.वि.रित्विक राजशेखर३-६, ६-३, ७-६(२);
नेसर जेऊर(९)वि.वि.सागर आहूजा ७-६(५), ६-२;
महिला गट:
ब्रिन्दा दयाल वि.वि.लोलाक्षी कांकरिया ६-१, ६-०;
स्वरदा परब वि.वि.अभिशिक्ता वर्मा ६-७(६), ६-२, ६-१;
नक्षत्रा कांकरिया वि.वि.ज्योत्स्ना मदाने ६-१, ६-३.
स्पर्धेतील खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे:
महिला: १. नताशा पल्हा(गोवा), २. हुमेरा शेख(तेलंगणा), ३.नित्याराज बाबुराज(तामिळनाडू), ४.युब्रानी बॅनर्जी(पश्चिम बंगाल), ५.साई दैदिप्या(तेलंगणा), ६.अविष्का गुप्ता(झारखंड), ७.सौम्या विज(गुजरात), ८.अपूर्वा एसबी(कर्नाटक);
पुरुष: १. फैजल कुमार(राजस्थान), २. परमवीर सिंग(दिल्ली), ३.इशाक इकबाल(पश्चिम बंगाल), ४.जयेश पुंगलिया(महाराष्ट्र), ५. नितीन कीर्तने(महाराष्ट्र), ६.अंशु कुमार भुयान(ओडीसा), ७.विनोद श्रीधर(तामिळनाडू), ८.अनुराग नेनवानी(दिल्ली).