---Advertisement---

बरोबर २८ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा

On: मंगळवार, ऑगस्ट 14, 2018 1:44 PM
---Advertisement---

बरोबर २८ वर्षांपुर्वी १४ आॅगस्ट १९९०ला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने कारकिर्दीतील पहिली शतकी खेळी केली होती. भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील हा दुसरा कसोटी सामना मॅंचेस्टरला झाला होता.

या सामन्यातील चौथ्या डावातील ६व्या दिवशी सचिनने हा कारनामा केला होता. या सामन्यात चौथा दिवस विश्रांतीसाठी राखीव होता.

पहिल्या डावात सचिनने १३६ चेंडूत ६८ धावा केल्या होत्या तर दुसऱ्या डावात १८९ चेंडूत नाबाद ११९ धावा केल्या.

एकवेळ सामना वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भारताला हा सामना जिंकायची चांगली संधी होती परंतु अखेरच्या दिवशी केवळ ६४ धावांमुळे हा सामना अनिर्णित राहीला.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने पहिल्या डावात ५१९ तर दुसऱ्या डावात ४ बाद ३२० धावा केल्या. पहिल्या डावातील ५१९ला उत्तर देताना भारताचा डाव ४३२ धावांत संपुष्टात आला.

त्यामुळे भारताला चौथ्या डावात ४०७ धावा करत सामना जिंकण्याची संधी होती. परंतु शेवटच्या दिवशी भारतीय संघ ६ बाद ३४३ धावांपर्यंतच मजल मारु शकला.

पुढे २००४मध्ये त्याने बांगलादेशविरुद्ध वैयक्तिक सर्वोच्च धावा (२४८) केल्या.

जेव्हा सचिनने हे शतक केले होते तेव्हा त्याचे वय फक्त १७ वर्ष आणि ११२ दिवस होते. कसोटीत शतक करणारा तो तिसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला होता.

आज सचिनच्या नावावर कसोटीत ५१ तर वनडेत ४९ शतके आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

मोठी बातमी- तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा

तब्बल ३८ वर्षांनंतर अँडरसनने केला आयसीसी क्रमवारीत हा मोठा पराक्रम

कर्णधार विराट कोहलीची आयसीसी क्रमवारीत घसरण

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment