भारतातील दोन महत्त्वाच्या लीग म्हणजे इंडियन प्रिमीयर लीग आणि प्रो-कबड्डी. यावर्षी या दोन्ही लीगचे प्रसारण एकाच चॅनेलवर होत आहे. त्यामुळे याचे जोरदार प्रोमोशन केले जात आहे.
आयपीएल २०१८चा रविवारी शेवटचा सामना आहे. वर्षाच्या उत्तरार्धात भारतीय क्रीडाप्रेमींना वेध लागतात ते कबड्डीचे.
भारतात याचा मोठा चाहता वर्गही आहे. या लीगला भारतात आय़पीएलखालोखाल टीव्हीवर सर्वाधिक पाहिले जाते.
अशा या लीगचा प्रमोशनचा भाग म्हणुन ब्रेट लीचा संघ बिंगा बाॅयज आणि इरफान पठाणचा संघ इरफान वाॅरियर्सचा एक प्रोमोशन व्हिडोओ सध्या पहायला मिळत आहे. प्रो-कबड्डी २०१८चा लिलाव ३० आणि ३१ मे रोजी होणार आहे. यापुर्वी हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे.
यावेळी छोट्या मुलांचे दोन संघ बनवण्यात आले. त्यात प्रत्येक संघात ६ छोटे खेळाडू आणि कर्णधार म्हणुन या दोन दिग्गजांनी धुरा सांभाळली. यावेळी इरफानच्या संघाने विजय मिळवला. इरफानने या सामन्यात एक ४ गुण मिळवुन देणारी रेड मारली तसेच जेव्हा त्याला ब्रेटली पकडायला आला तेव्हा त्यालाही बाद केले.
There was surely no love lost between @BrettLee_58 and @IrfanPathan when they faced off on the kabaddi mat! How will @darensammy88 and his boys perform? Tune in to #KentCricketLIVE for the action before the #BESTvsBEST clash tomorrow only on Star Sports! https://t.co/jskFkHKzu3
— Star Sports (@StarSportsIndia) May 24, 2018
प्रो-कबड्डी यावर्षी आॅक्टोबर महिन्यापासून होत असुन यात १२ संघ भाग घेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-विराट कोहलीप्रमाणेच हे ३ प्रो-कबड्डी स्टार ५ हंगामात खेळले एकाच संघाकडून
–प्रो कबड्डी- जाणून घेऊयात लिलवासंदर्भातील सर्व नियमावली
–या दिग्गज माजी खेळाडूची पुणेरी पलटणच्या प्रशिक्षकपदी निवड
–महाराष्ट्राच्या या तीन खेळाडूंवर लागु शकते प्रो-कबड्डीत सर्वाधिक बोली
–संपुर्ण यादी- प्रो कबड्डी लिलावासाठी महाराष्ट्राचे हे ४२ खेळाडू आहेत उपलब्ध
–आयपीएलप्रमाणेच प्रो-कबड्डी लिलावातही वापरता येणार आरटीएम
–कबड्डी- ई भास्करन तमिल थलाइवाजचे मुख्य प्रशिक्षक
–प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामासाठी ९ संघानी २१ खेळाडूंना केले कायम