भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात रविवार रोजी (३१ ऑक्टोबर) दुबई येथे आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ चा ‘करा वा मरा’ सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ कसून सराव करत आहेत. या सामन्यात न्यूझीलंडला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. कारण गेली १८ वर्षे न्यूझीलंडचा संघ विश्वचषकात भारतीय संघाला पराभूत करत आहे. परंतु उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्याच्या दृष्टीने हा सामना अतिशय महत्त्वाचा असल्याने भारतीय संघही विजयासाठी पूर्ण जोर लावताना दिसेल. परंतु अनेक अशीही काही कारणे आहेत, ज्यामुळे भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागू शकतो.
भारतीय संघाने गेल्या काही वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत आयसीसीच्या नॉकआऊट (बाद फेरी) सामन्यात प्रवेश केला आहे. परंतु त्यांना जेतेपद पटकावता आले नाहीये. यामागील प्रमुख कारण पंच रिचर्ड केटलब्रॉ हे आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. रिचर्ड केटलब्रॉ यांनी भारतीय संघाच्या अनेक नॉकआऊट सामन्यात पंचगिरी केली आहे, ज्यामध्ये भारतीय संघाला अखेरच्या क्षणी विजय मिळवण्यात अपयश आले आहे.
बऱ्याच मोठ्या स्पर्धांमध्ये करावा लागला पराभवाचा सामना
साल २०१४ पासून जेव्हा जेव्हा भारतीय संघाने आयसीसीच्या विश्वस्तरीय स्पर्धांचे नॉकआऊट सामने खेळले आहेत, तेव्हा तेव्हा रिचर्ड केटलब्रॉ हे पंच होते. भारतीय संघाने २०१४ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. परंतु अंतिम सामन्यात श्रीलंका संघाने त्यांना पराभूत करत विश्वचषक जिंकला होता. या सामन्यात देखील रिचर्ड केटलब्रॉ हे पंच होते. त्यांनतर २०१५मध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या वनडे विश्वचषक उपांत्य फेरी सामन्यातही भारताचा पराभव झाला होता.
इतकेच नव्हे तर रिचर्ड केटलब्रॉ हे पंच असताना भारतीय संघाला वेस्ट इंडिजविरुद्ध २०१६ मध्ये झालेल्या टी२० विश्वचषक उपांत्य फेरी सामन्यात, पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ अंतिम सामन्यात आणि न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या २०१९ विश्वचषक उपांत्य फेरी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. या सर्व महत्त्वांच्या सामन्यात विजयाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या भारतीय संघासाठी पंच रिचर्ड केटलब्रॉ दुर्दैवी ठरले आहेत.
https://twitter.com/Shiva04596334/status/1454741580502294539?s=20
याखेरीज रिचर्ड केटलब्रॉ पंच असलेल्या दर कसोटी सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला आहे. चिंतेची बाब म्हणजे, रविवारी होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टी२० विश्वचषक सामन्यातही रिचर्ड केटलब्रॉ हे पंच असल्याने कोट्यावधी भारतीय चाहत्यांचे पुन्हा एकदा मन तुटू शकते.
दुसरीकडे रिचर्ड केटलब्रॉ यांच्याबरोबर असलेले दुसरे मैदानी पंच मराइस इरॅस्मस असणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
बटलर-बेअरस्टो जोडीने षटकारांची वर्षा करत झम्पाची उडवली दाणादाण, बघून मॉर्गनलाही आली दया






