आयपीएल 2020च्या पुर्वी सनरायझर्स हैद्राबाद संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. हैद्राबाद संघाचा कर्णधार आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अद्यापदी आयपीएलमध्ये भाग घेण्यासाठी व्हिसा देण्यात आलेला नाही. त्यामुळे त्याला आयपीएलमधून बाहेर केले जाण्याचीही शक्यता आहे.
एका वृत्तानुसार असे समोर आले आहे की, भारत सरकारने वॉर्नरचा व्हिसा रद्द केला आहे. पण अजूनही हे कळलेले नाही की, त्याचा व्हिसा कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने बदललेल्या नियमांमुळे रद्द करण्यात आला की कोणत्या तांत्रिक अडचणीमुळे रद्द करण्यात आला.
वॉर्नरला यंदा हैद्राबाद संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. त्यामुळे जर त्याला या हंगामात खेळू दिले नाही तर हैद्राबाद संघाला मोठा धक्का बसणार आहे.
तसे पाहिले तर वॉर्नर हा हैद्राबाद संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. चेंडू छेडछाड प्रकरणामुळे त्याला 11व्या आयपीएल हंगामात खेळता आले नव्हते. तरी त्याने आयपीएल 2019मध्ये दमदार फलंदाजी करत सर्वाधिक धावा केल्या होत्या. यावेळी त्याने 11 सामन्यात एकूण 692 धावा केल्या होत्या.
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे भारतीय परदेशी मंत्रालयाने मोठा निर्णय घेत 15 एप्रिलपर्यंत परदेशी खेळाडूंचा व्हिसा रोखला आहे. त्यामुळे 15 एप्रिलनंतर परदेशी खेळाडू आयपीएलचा भाग असतील का नाही हे पहावे लागेल.






