आयपीएल 2025 पूर्वी अनेक संघांमध्ये बदल होत आहेत. काही संघांच्या कर्णधारांमध्ये बदल होण्याच्या बातम्या आहेत, तर काहींच्या मुख्य प्रशिक्षकांत बदल होऊ शकतो. आता बातमी प्रिती झिंटाची मालकी असलेल्या पंजाब किंग्ज संघाबद्दल आहे.
आयपीएल 2025 पूर्वी पंजाब किंग्जनं आपल्या संघात मोठा बदल केला आहे. ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’च्या वृत्तानुसार, फ्रॅन्चाईझीनं दिल्ली कॅपिटल्सचे माजी मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. पंजाब किंग्जला बऱ्याच काळापासून नव्या प्रशिक्षकाची आवश्यकता होती. या पदासाठी विविध नावांची चर्चा होती. मात्र आता रिकी पॉन्टिंग यांचं नाव फायनल झालं आहे.
ऑस्ट्रेलियाचे विश्वविजेते कर्णधार रिकी पॉन्टिंग यांनी 7 वर्ष दिल्ली कॅपिटल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली. ते 2018 मध्ये संघाची जोडले गेले होते. त्यांनी आयपीएल 2024 नंतर संघाची साथ सोडली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली कॅपिटल्सनं 2020 मध्ये आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली होती. मात्र संघ एकदाही ट्रॉफी जिंकू शकला नाही.
आयपीएल 2024 मध्ये ट्रेव्हर बेलिस पंजाब किंग्जचे मुख्य प्रशिक्षक होते. मात्र सिझन संपल्यानंतर फ्रॅन्चाईझीनं त्यांना घरचा रस्ता दाखवला. तेव्हापासून फ्रॅन्चाईझी नव्या प्रशिक्षकाच्या शोधात होती. मध्यंतरी, पंजाबच्या संघाला भारतीय प्रशिक्षक हवा असल्याच्या बातम्या आल्या होत्या. या पदासाठी भारताचे माजी फलंदाज वसीम जाफर यांचं नाव आघाडीवर होतं. मात्र आता संघानं रिकी पॉन्टिंग यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.
आयपीएल 2017 पासून पंजाब किंग्जचे मुख्य प्रशिक्षक
वीरेंद्र सेहवाग – आयपीएल 2017
ब्रॅड हॉज – आयपीएल 2018
माईक हेसन – आयपीएल 2019
अनिल कुंबळे – आयपीएल 2020
अनिल कुंबळे – आयपीएल 2021
अनिल कुंबळे – आयपीएल 2022
ट्रेव्हर बेलिस – आयपीएल 2023
ट्रेव्हर बेलिस – आयपीएल 2024
रिकी पाँटिंग – आयपीएल 2025
हेही वाचा –
विराट की रोहित, आगामी कसोटी मोसमात कोण धावांचा पाऊस पाडणार? दिग्गजाने दिले उत्तर
विराटनं महादेवाचं नाव घेत ऑस्ट्रेलियाचा बॅन्ड वाजवला, तर गंभीरनं हनुमान चालिसा ऐकत भारताला पराभवातून वाचवलं!
“हिंदूंवर अत्याचार होत असताना परवानगी कशी?” भारत-बांगलादेश मालिकेवर आदित्य ठाकरेंचा सवाल