भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणले जाते. उत्कृष्ट फलंदाजाबरोबर तो एक उत्कृष्ट कर्णधारही आहे. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार आहे. सोमवारी (१८ मे) आर अश्विनबरोबर झालेल्या इंस्टाग्राम लाइव्हवर रोहतने त्याच्या एमआय संघाच्या नेतृत्वपदाविषयी मोठा खुलासा केला आहे.
एमआयने आयपीएलच्या आतापर्यंतच्या १२ हंगामात २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ अशा प्रकारे ४वेळा चषकावर आपले नाव कोरले आहे. विशेष म्हणजे, एमआयने हे चारही विजेतेपद रोहितच्या नेतृत्त्वाखाली जिंकले आहेत.सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग आणि रिकी पाँटिंग हेदेखील एमआयचे कर्णधार होते. मात्र त्यांना संघाला विजेतेपद मिळवून देण्यात यश आले नाही.
अश्विनशी बोलताना रोहित म्हणाला की, “२०१२नंतर सचिन पाजींनी एमआयच्या नेतृत्वाची धुरा सांभाळण्यास नकार दिला होता. २०१३मधील आयपीएल लिलावानंतर रिकी पाँटिंग आमच्या संघात सामाविष्ट झाला होता. त्यावेळी भज्जी पाजी संघाचे कर्णधार बनले होते. मात्र, त्यांना का कर्णधारपदावरुन काढून टाकण्यात आलेे, हे मला समजले नाही. म्हणून मला वाटले होते की, आता मीच संघाचा कर्णधार बनेन, पण पाँटिंगला संघात निवडण्यात आले होते.”
रोहितनुसार पाँटिंगला संघातील प्रत्येक खेळाडूची मानसिकता समजून घ्यायाची होती. त्यामुळे त्याने बॉन्डिंग सेशनही आयोजित केले होते. “मी पाँटिंगच्या व्यक्ती व्यवस्थापन कौशल्याने खूप प्रभावित होतो. तो आपल्या संघ सहकाऱ्यांकडून सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करु घेण्यात पारंगत होता. त्याने संघातील खेळाडूंना ४-४मध्ये विभागले होते. यावेळी मी आणि पाँटिंगसोबत २ देशांतर्गत क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला होता.” Ricky Ponting assigned mumbai indians captaincy to rohit sharma instead of dinesh kartik
“मात्र, त्यावेळी पाँटिगला जास्त धावा करता आल्या नव्हत्या. म्हणून त्याने संघाचे नेतृत्वपद सोडून दिले. त्याने त्यावेळी ६ सामन्यात फक्त ५२ धावा केल्या होत्या. त्यामुळे दिनेश कार्तिकला कर्णधार बनवण्याची चर्चा झाली होती. पण, अचानक पाँटिंगने मला बोलावले आणि म्हटले की, तू कर्णधार बनला आहेस. पाँटिंग त्यावेळी संघाचा प्रशिक्षकही होता. म्हणून हे शक्य झाले. त्याने नेहमी माझी मदत केली आहे, असे रोहित पुढे बोलताना म्हणाला.”
ट्रेंडिंग घडामोडी-
रोहित म्हणतो, कॅप्टन कूल धोनी नसता तर ही गोष्ट कधीच नसतो करु शकलो
पाकिस्तानच्या दोन मोठ्या खेळाडूंनी सोडला टीमचा वाॅट्सअप ग्रुप
प्रत्येक क्रिकेट प्रेमीने आवर्जून पाहाव्यात अशा ‘युवी’च्या…