---Advertisement---

पॉंटिंग म्हणतोय, “त्याला पाहून मला सायमंड्स आठवतो”

On: रविवार, जुलै 24, 2022 8:20 PM
Andrew-Symonds
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू ऍण्ड्रू सायमंड्स याचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले. त्याच्या निधनानंतर क्रिकेटविश्व हळहळले होते. एकेकाळी सायमंड्सचा कर्णधार राहिलेल्या रिकी पॉंटिंग याला त्याची आठवण आली. त्याने एका युवा फलंदाजाला पाहून आपल्याला सायमंड्सची आठवण होत असल्याचे म्हटले. तसेच आपण त्या खेळाडूला निवड समिती अध्यक्ष असतो तर आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियासाठी केव्हाच खेळायची संधी दिली असती असेही म्हटले.

कोणाबाबतीत पॉंटिंग म्हणाला ही गोष्ट

ऑस्ट्रेलियाला दोन वेळा विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार असलेल्या रिकी पॉंटिंग याने नुकतीच एका क्रिकेट संकेतस्थळाला मुलाखत दिली. त्याने या मुलाखतीत युवा फलंदाज टीम डेव्हिड याचे तोंडभरून कौतुक केले. पॉंटिंग म्हणाला,

“मी निवडकर्ता असतो तर टीम डेव्हिडसारखा खेळाडू नक्कीच संघात ठेवला असता. त्याला संधी मिळाली असती किंवा नसती हे महत्त्वाचे नाही. परंतु त्याच्याकडे ज्या पद्धतीने चेंडू मारण्याची क्षमता आहे, तो एक जबरदस्त मॅचविनर आहे. तो एक असा खेळाडू आहे जो खरोखरच तुम्हाला टी२० विश्वचषक जिंकून देऊ शकतो. त्याला पाहून मला २००३ च्या ऍड्र्यू सायमंड्सची आठवण होते.”

डेव्हिड हा सिंगापूरचा खेळाडू आहे. मात्र, त्याचे वडील ऑस्ट्रेलियाच्या असल्याने तो ऑस्ट्रेलियासाठी खेळण्यास पात्र ठरतो. जगभरातील सर्व टी२० लीगमध्ये खेळून त्याने नाव कमावले आहे. आपल्या आक्रमक फटकेबाजीसाठी त्याला ओळखले जाते. यावर्षी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स साठी त्याने काही जबरदस्त खेळ्या केल्या होत्या. त्याने आतापर्यंत टी२० मध्ये ४६.५० च्या सरासरीने आणि १५८ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या अनेक आजी-माजी खेळाडूंनी यावर्षी होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी डेव्हिड याला ऑस्ट्रेलियन संघात संधी द्यावी असे म्हटले. स्वतः डेव्हिड याने आपल्याला संधी मिळाल्यास आपण त्या संधीचे सोने करू असे म्हटले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

जडेजा म्हणतोय ‘धवनला भारतीय संघात घेऊच नका’, धिम्या खेळीवरून साधला थेट निशाणा 

विराट नाही तर सूर्यकुमार ठरतोयं ‘या’ खेळाडूसाठी धोकादायक, भारताच्या दिग्गजाचे आश्चर्यकारक विधान 

‘तो रिषभ पंत नाही, दोघांत खूप अंतर’, खराब प्रदर्शनावरुन पाकिस्तानी दिग्गजाचा सॅमसनवर निशाणा 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---