आगामी इंडियन प्रीमियर लीगची (Indian Premier League) चाहत्यांना आतुरता लागली आहे. त्यापूर्वी मेगा लिलाव (Mega Auction) होणार आहे. बीसीसीआयने मेगा लिलावाबाबत जाहीर केलेल्या नवीन नियमांनुसार सर्व संघांनी गुरूवारी (31 ऑक्टोबर) रोजी रिटेन्शन यादी जाहीर केली. तत्पूर्वी पंजाब किंग्जने (Punjab Kings) फक्त 2 अनकॅप्ड खेळाडूंना रिटेन करत लिलावासाठी सर्वाधिक रक्कम राखून ठेवली. पंजाबचा संघ आता नवे प्रशिक्षक रिकी पाॅन्टिंगच्या (Ricky Ponting) मार्गदर्शनाखाली 2025च्या आयपीएलमध्ये मैदानात उतरणार आहे.
पंजाबच्या आयपीएल रिटेन्शन यादीमुळे रिकी पॉन्टिंगची दृष्टी बदलाचे संकेत देते कारण फ्रँचायझी नवीन आणि वेगळ्या मार्गावर जाण्यासाठी सज्ज आहे. संघाने प्रतिभावान प्रभसिमरन सिंग आणि शशांक सिंग या 2 अनकॅप्ड खेळाडूंना कायम ठेवले. तर, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा, इंग्लंडचा सॅम करन आणि भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) या स्टार खेळाडूंना सोडण्याचा पर्याय निवडला.
आयसीसी रिव्ह्यूशी बोलताना रिकी पाॅन्टिंग (Ricky Ponting) म्हणाला, “मी एका नवीन, नव्या सुरुवातीबद्दल खूप उत्सुक आहे. संघाकडे लिलावाची सर्वात मोठी रक्कम आहे, जी महत्वाकांक्षी आणि मजबूत संघ तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. माझ्यासाठी मुख्य आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही संपूर्ण फ्रेंचायझी वेगळी बनवणे. आपल्याला सर्व बळकट करून मैदानावर निकाल लावायचा आहे. आयपीएलमध्ये आम्ही आमची छाप सोडावी अशी माझी इच्छा आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs NZ; मुंबई कसोटीत भारताचे वर्चस्व! दुसऱ्याच दिवशी न्यूझीलंडचे 9 गडी तंबूत
वयाच्या 25व्या वर्षापर्यंत सर्वाधिक वेळा 90 धावांच्या जाळ्यात फसले ‘हे’ 5 भारतीय खेळाडू
माजी क्रिकेटरच्या निधनाची खोटी माहिती पसरवल्यानंतर ‘या’ दिग्गजाने मागितली माफी!