सध्या भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगला आहे. त्यानंतर भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर- गावसकर मालिका खेळली जाणार आहे. तत्पूर्वी या मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून सलामीला कोण येणार? याबाबत माजी दिग्गज खेळाडू रिकी पाॅन्टिंगने (Ricky Ponting) मोठे वक्तव्य केले आहे.
(22 नोव्हेंबर) पासून भारत-ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात कोण करणार याबाबत अद्याप सस्पेंस कायम आहे. नॅथन मॅकस्वीनी, मार्कस हॅरिस आणि सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा ही 4 नावे सलामीवीरपदासाठी पुढे असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाॅन्टिंगने यावर आपले मत मांडले आहे.
ऑस्ट्रेलिया अ संघाचा कर्णधार नॅथन मॅकस्विनी हा भारताविरूद्ध कसोटी पदार्पण करण्यासाठी सॅम कोन्स्टासपेक्षा चांगला खेळाडू असल्याचे मत माजी कर्णधार रिकी पाॅन्टिंगने (Ricky Ponting) व्यक्त केले. तो म्हणाला “मी याबद्दल थोडा अधिक विचार केला, आणि तो (कॉन्टास) खूप तरुण आहे आणि तो कदाचित ऑप्टस स्टेडियम किंवा गाबा सारख्या मैदानावर खेळला नसेल. त्याने ॲडलेड ओव्हलवर गुलाबी चेंडूने सामनाही खेळला नसेल, त्यामुळे या युवा खेळाडूविरूद्ध अनेक गोष्टी आहेत, पण तो प्रतिभावान आहे यात शंका नाही.”
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय संघ फलंदाजी करणं विसरला, घरच्या मैदानावर क्लीन स्वीपची नामुष्की!
कसोटीत टी20 खेळतोय हिटमॅन, पिचवर अर्धा तासही थांबेना! किंग कोहलीकडून ही निराशा..
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारे संघ (टाॅप-5)