भारताचा संघ ऑस्ट्रेलियात नोव्हेंबर 2020 ते जानेवारी 2021 दरम्यान 3 वनडे, 3 टी-20 व 4 कसोटी सामने खेळणार आहे. वनडे आणि टी-20 मालिकेनंतर 17 डिसेंबर पासून कसोटी मालिका सुरू होणार आहे. यातील पहिला सामना खेळल्यानंतर पालकत्व रजा घेऊन भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली भारतात परतणार आहे. त्याच्या अनुपस्थित भारतीय संघाची फलंदाजी फळी सुनिश्चित नसेल असे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगला वाटत आहे.
पाँटिंगच्या मते भारताचा संघ त्याच्या अनुपस्थितीत दबावात येऊन खेळेल. नेतृत्व आणि मजबूत फलंदाजी नसल्याने इतर खेळाडूंवर दबाव येऊ शकतो.
“कोहली भारतात परतल्यानंतर अजिंक्य रहाणे कर्णधार बनेल. पण त्याच्यावर नेतृत्व आणि महत्त्वपूर्ण चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा दबाव असेल. नेतृत्वासाठी रहाणेला चौथा क्रमांक सोडावा लागू शकतो. अशात कोण त्याच्या जागी खेळणार?” असा प्रश्न पाँटिंगने भारतीय संघव्यवस्थापनेसमोर उपस्थित केला आहे.
भारतीय संघाच्या कसोटी गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी सारखे गोलंदाज आहेत. शिवाय इशांत शर्मा देखील दुखापतीतून सावरला असल्याने परत येऊ शकतो. तर उमेश यादव व नवदीप सैनी यांची देखील कसोटी मालिकेसाठी निवड झाली आहे. इतके चांगले गोलंदाजी पर्याय असून भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत अधिक प्रश्नांची उत्तरे शोधावी लागणार असं पाँटिंगला वाटत आहे.
पाँटिंगने संगीतले की विल पुकोवस्की आणि कॅमेरॉन ग्रीनच्या उपस्थितीत ऑस्ट्रेलिया संघाला जे प्रश्न पडलेत त्यापेक्षा अधिक प्रश्न भारतीय संघाला असतील. बुमराह, शमी, यादव, इशांत सारख्या गोलंदाजांना घाययचं की सैनी , सिराज सारख्या युवकांना संधी द्यायची यावरही विचार व्हायला हवा. शिवाय भारतीय संघात काही फिरकीपटू आहेत. मग गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्यात कोणता फिरकीपटू घ्यायचा यावरही विचार व्हावा असे पाँटिंगचे मत आहे.
भारताने 2018-2019 मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात जाऊन कसोटी मालिका जिंकून इतिहास रचला होता. या मालिकेत स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वोर्नर असे दोन मुख्य फलंदाज ऑस्ट्रेलिया संघात नव्हते. भारताने तेव्हा चांगले प्रदर्शन केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट-स्मिथची नजर सचिन तेंडुलकरच्या मोठ्या विक्रमावर, कोण मारणार बाजी?
भारताकडे बुमराह आणि शमी असेल, तर आमच्याकडे कमिन्स, स्टार्क आहेत, पाहा कोण म्हणतंय