---Advertisement---

आयपीएलपुर्वीच दिल्लीचे कोच रिकी पॉटींग व या खेळाडूमध्ये वाद; रिकी म्हणतो, हे करु देणार नाही

On: गुरूवार, ऑगस्ट 20, 2020 7:55 PM
---Advertisement---

मुंबई । इंडियन प्रीमियर लीग २०२० च्या काही दिवस आधी दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांनी स्वतःच्या संघातील वरिष्ठ खेळाडूविरोधात प्रतिक्रिया दिली आहे. दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांनी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याला मांकडिंग या विवादास्पद पद्धतीने खेळाडूला बाद करण्याची परवानगी देणार नसल्याचे स्पष्ट केले. पॉन्टिंग म्हणाला की, ‘ही पद्धत ‘स्पोर्टिंग स्पिरीट’ मध्ये बसत नाही.’

गेल्या आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्सचा फलंदाज जोस बटलर याला 69 धावांवर असताना पंजाबचा कर्णधार अश्विनने बाद केले. चेंडू टाकण्या आधीच जोस बटलर क्रीजच्या बाहेर जात असल्याचे पाहून आर अश्विनने त्याला रनआऊट केले. या पद्धतीनुसार बाद करणे क्रिकेटच्या नियमानुसार आहे. पण काही खेळाडू याला खेळ भावनांच्या विरोधात समजतात. 1947 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या बिल ब्राउनलाही भारताच्या वीनू मांकडने याच पद्धतीने बाद केले होते.

19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती (युएई) मध्ये सुरू होणार्‍या यावर्षीच्या आयपीएलमध्ये आर. अश्विन दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे. गतवर्षी जोस बटलरला मांकडिग पद्धतीने बाद केल्याच्या निर्णयाचा बचाव करत ते खेळाच्या नियमांत असल्याचे पाँटिगने सांगितले. तो म्हणाला, ” हा नियम खेळभावनेच्या विरोधात आहे. आमचा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये त्याचा वापर करणार नाही.”

त्याने ‘द ग्रेड क्रिकेटर पॉडकास्ट’ला सांगितले, “मी त्यांच्याशी  याबद्दल बोलणार आहे, प्रथम मी हे काम करणार आहे.  त्याच्याशी चर्चा होईल. मला वाटतं की कदाचित तो असे म्हणेल की हे नियमांनुसार होते आणि तसे करण्याचा त्याला अधिकार आहे.”

पॉन्टिंग म्हणाले, “या पद्धतीने बाद करणे हे खेळ भावनेच्या विरोधात नाही असे मला वाटते. मागील वर्षी तो दुसऱ्या संघाकडून खेळत खेळत होता. यंदा मात्र तो दिल्लीच्या संघात आहे. तो असे करू शकणार नाही. तो एक महान गोलंदाज आहे आणि त्याने आयपीएलमध्ये बर्‍याच वेळा चांगली कामगिरी केली आहे.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---