आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरला. संघाच्या या खराब कामगिरीसाठी मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांना जबाबदार मानलं जात होतं. आता बातमी आली आहे की, रिकी पाँटिंग यांनी दिल्ली कॅपिटल्सचं मुख्य प्रशिक्षकपद सोडलं आहे. ते आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या डगआऊटमध्ये दिसणार नाहीत.
रिकी पाँटिंग यांना प्रशिक्षकपदावरून हटवण्याबाबत दिल्ली कॅपिटल्सकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. उल्लेखनीय म्हणजे, आयपीएल 2024 नंतर रिकी पाँटिंग यांचा डीसीसोबतचा करार संपला आहे. आता दिल्ली संघ त्यांच्या जागी कोणाची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करतो हे पाहणं महत्त्वाचं आहे.
कर्णधार रिषभ पंत दुखापतीतून सावरल्यानंतर आयपीएल 2024 मध्ये संघात परतला. मात्र त्याच्या नेतृत्वाखाली दिल्लीची कामगिरी काही खास राहिली नाही. संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी राहिला. असं असलं तरी पंत आणि मार्गदर्शक सौरव गांगुली पुन्हा एकदा आयपीएल 2025 मध्ये त्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत, परंतु पाँटिंगबद्दल त्यांच्यासोबत नसेल.
रिकी पाँटिंग 2018 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक बनले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीनं तीन वेळा प्लेऑफ फेरी गाठली. मात्र संघ एकदाही आयपीएल चॅम्पियन बनू शकला नाही. दिल्ली कॅपिटल्सचा संघ 2020 मध्ये उपविजेता राहिला होता. त्या हंगामात श्रेयस अय्यर संघाचा कर्णधार होता.
आता आयपीएल 2025 पूर्वी मेगा लिलाव होणार आहे. यासाठी बीसीसीआयनं तयारी सुरू केली असून, खेळाडू संघात कायम ठेवण्याबाबत फ्रँचायझींकडून सल्ला घेतला जात आहे. बीसीसीआय सर्व संघमालकांसोबत बैठक घेणार असून, त्यानंतर किती खेळाडूंना कायम ठेवायचं याचा निर्णय घेतला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेच्या वेळापत्रकात बदल, जाणून घ्या आता कधी अन् कुठे खेळले जातील सामने
शुबमन-जयस्वालची विस्फोटक खेळी! भारताविरुद्ध झिम्बाब्वेचा दारूण पराभव
टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीमधून माघार घेऊ शकते का? असं झालं तर स्पर्धा कशी खेळली जाईल?