fbpx
Sunday, April 18, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हॉटेलची रुम नीट नसल्याने व धोनीशी वाद झाल्याने रैना दुबईतून भारतात परतला?

August 31, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

मुंबई ।  कोरोना विषाणूमुळे इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 13 वा हंगाम 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये खेळवला जाणार आहे. सर्व 8 संघ युएईमध्ये पोहोचले आहेत आणि त्यांना बायो-प्रोटोकॉल अंतर्गत 6 दिवस  क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) चा मुख्य खेळाडू सुरेश रैनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तो अचानक युएईहून भारतात घरी परतला. पूर्वी, एक वैयक्तिक कारण सांगितले गेले होते, परंतु आता संघाचे मालक एन. श्रीनिवासन यांनी मोठे विधान केले आहे.

खराब हॉटेल रूम आणि कोरोना विषाणूच्या भीतीमुळे सुरेश रैना आयपीएल 2020  सोडून घरी परतला असल्याची, माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष एन.  श्रीनिवासन यांनी माहिती दिली आहे.  ‘आउटलुक’ च्या म्हणण्यानुसार, हॉटेलच्या खोलीवरून रैना आणि संघाचा कर्णधार एमएस धोनी यांच्यात वादही झाला. कॅप्टन कूलने अष्टपैलू खेळाडूला समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याने नकार दिला आणि स्पर्धा सोडण्याचा निर्णय घेतला.

मुलाखतीत सीएसके मालक श्रीनिवासन यांनी याबद्दल मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, ”रैनाला अचानक संघ सोडल्याने मोठा धक्का बसला आहे, परंतु कर्णधार धोनीने परिस्थिती सांभाळली आहे. क्रिकेटर जुन्या काळातील कलाकारांसारखे असतात. चेन्नई  सुपर किंग्ज हा संघ कुटुंबासारखा आहे आणि सर्व ज्येष्ठ खेळाडू एकत्र राहण्यास शिकले आहेत.”

कधीकधी यश डोक्यावर जाते

ते म्हणाले की, ‘संघ रैनाच्या प्रकरणातून सावरला आहे. मला असे वाटते की, आपण आनंदी नसल्यास आपण परत जाऊ शकता.  मी कोणावरही काहीतरी करण्यास दबाव आणू शकत नाही.  कधीकधी यश तुमच्या डोक्यावरुन जाते. रैना आणि धोनी यांच्यात चर्चा झाली आहे. कर्णधाराने त्याला आश्वासन दिले आहे की, कोरोनाचे प्रकरण वाढले तरी काळजी करण्याची काहीच गरज नाही. धोनीने झूम कॉलवर टीमशी बोलून सर्वांना सुरक्षित रहाण्यास सांगितले आहे.’

रैनाला पगार मिळणार नाही

आयसीसीच्या माजी अध्यक्षांना सुरेश रैना परतेल असा विश्वास आहे. ते म्हणाले, ‘मला वाटते की त्याला परत यायला आवडेल.  हंगाम सुरू झालेला नाही आणि त्याने काय  11 कोटी रुपये सोडले आहे. आयापीएलमध्ये परतला नाही तर त्याला हा पगार मिळणार नाही.’

पठाणकोट येथे त्याच्या नातेवाईकांवर दरोडेखोरांनी हल्ला केला होता, त्यातच त्यांच्या एका नात्याचा मृत्यू झाला होता. म्हणून रैनाने आयपीएलमधून माघार घेतली आहे, अशी सुरुवातीला माहिती समोर आली होती.

काय आहे संपूर्ण प्रकरण

सीएसकेचा संघ 21 ऑगस्टला दुबईला पोहोचला. तेव्हापासून रैना हॉटेलच्या खोलीवर खूश नव्हता आणि त्याला कोरोनासाठी कठोर प्रोटोकॉल हवा होता. त्याला धोनीसारखे कक्ष हवे होते. कारण त्याच्या खोलीची बाल्कनी योग्य नव्हती. दरम्यान,  सीएसकेच्या संघातील दोन खेळाडू (वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋतुराज गायकवाड) यांच्यासह 13 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह झाल्यावर रैना अधिक घाबरला आहे.


Previous Post

…म्हणून १७ वर्षे खेळू शकलो, अँडरसनने स्वत: केले हे रहस्य उघड

Next Post

चेन्नई सुपर किंग्ससमोरचे विघ्न दूर होईना; आता आणखी एक वाईट बातमी आली समोर

Related Posts

Photo Courtesy: Screengrab/Hotstar
IPL

क्षेत्ररक्षण करताना ट्रेंट बोल्टचा तोल गेला अन् घडलं असं काही; चाहते म्हणाले, ‘ही फील्डिंग की स्विमिंग’

April 18, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

‘आमच्यासोबत हे काय घडतंय काहीच कळेना,’ सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार वॉर्नरने व्यक्त केली नाराजी 

April 18, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चाहर-बोल्टच्या भेदक माऱ्यापुढे ‘ऑरेंज आर्मी’ गारद; आयपीएलच्या मोठ्या विक्रमात मुंबईकर अव्वलस्थानी

April 18, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

सुपर संडे: आज कोहली-मॉर्गन आमने सामने, ‘अशी’ असेल आरसीबी आणि केकेआरची प्लेइंग XI

April 18, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

MIvSRH: रोहितच्या ब्रिगेडचा सलग दुसरा विजय, कर्णधाराने ‘यांना’ ठरवले मॅच विनर

April 18, 2021
Photo Courtesy: Twitter/@Media_SAI
कुस्ती

Asian Wrestling Championship: भारताचा कुस्तीपटू रवि दहियाने जिंकले सुवर्ण पदक, तर बजरंग पुनिया ठरला रौप्य पदकाचा मानकरी

April 18, 2021
Next Post

चेन्नई सुपर किंग्ससमोरचे विघ्न दूर होईना; आता आणखी एक वाईट बातमी आली समोर

जिममध्ये डान्स, एफ-१ गेम, पूल अशा गोष्टी करत बायो-बबलमध्ये खेळाडू घेतायेत आनंद, पाहा

ही भारतीय कंपनी झाली आयपीएलची पार्टनर; बीसीसीआयने केली घोषणा

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.