शुक्रवार रोजी (३० एप्रिल) पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झालेल्या आयपीएल २०२१ च्या २६व्या सामन्यात पंजाबने सांघिक कामगिरी केली. त्याचे फळ त्यांना ३४ धावांच्या फरकाने विजय संपादन करत मिळाले. हंगामातील तिसरा विजय नोंदवल्यानंतर या संघाने गुणतालिकेत पाचव्या स्थानावर ताबा मिळवला आहे. परंतु विजयाच्या जल्लोषात पंजाब संघासाठी एका गोष्टीची चिंता सतावत आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज रिले मेरेडिथ याच्या दुखापतीची ही चिंता आहे.
बेंगलोराच डाव संपण्यापुर्वी मेरेडिथला दुखापत झाली होती. त्यामुळे तो मैदानाबाहेर पडला होता. डावातील शेवटचे षटक टाकण्यासाठी आलेल्या मेरेडिथच्या पहिल्याच चेंडूवर कायल जेमिसनने खणखणीत षटकार मारला. त्यापुढील त्याने १४०.१ किमी दर ताशी वेगाने टाकला. यावर जेमिसनने सरळ रेषेत शॉट खेळला आणि चेंडू जाऊन मेरेडिथच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला लागला.
मेरेडिथला तो चेंडू इतका जोराने लागला की फिजिओंना त्याला त्वरित मैदानाबाहेर न्यावे लागले. त्यानंतर शेवटच्या षटकातील उर्वरित चेंडू मोहम्मद शमीने टाकले. अद्याप अजून त्याची दुखापत गंभीर आहे की नाही, हे कळालेले नाही. जर त्याची दुखापत गंभीर असल्यास तो उर्वरित हंगामातून माघार घेऊ शकतो. यामुळे पंजाब संघाला मोठा धक्का बसू शकतो.
मेरेडिथने या सामन्यात ३.२ षटके गोलंदाजी करताना २९ धावा दिल्या आणि एकमेव विकेट घेतली. त्याने बेंगलोरचा सलामीवीर देवदत्त पडीक्कल याला त्रिफळाचीत केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-