---Advertisement---

खेळाडूमुळे नव्हे तर पंचांमुळे केकेआरने गमावली लखनऊविरुद्धची मॅच? रिंकू सिंगबाबत दिला चुकीचा निर्णय

Rinku-Singh-No-Ball
---Advertisement---

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात बुधवारी (१९ मे) आयपीएल २०२२चा ६६व साखळी फेरी सामना खेळला गेला. मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर झालेला हा सामना लखनऊने अवघ्या २ धावांच्या अंतराने जिंकला. या सामना विजयानंतर लखनऊने प्लेऑफसाठी पात्रता मिळवली आहे, तर कोलकाता प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. या सामन्यानंतर कोलकाताचा फलंदाज रिंकू सिंग याच्याबाबत पंचांनी दिलेल्या निर्णयावरून विवाद सुरू झाला आहे. 

रिंकू (Rinku Singh) ज्या चेंडूवर बाद झाला, तो चेंडू नो बॉल (No Ball) होता, असा दावा क्रिकेट चाहते सोशल मीडियावर करत आहेत. कोलकाताच्या पराभवासाठी सोशल मीडियावर पंचांना ट्रोल केले जात आहे.

त्याचे झाले असे की, प्रथम फलंदाजी करताना लखनऊने कोलकाताला २११ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताला शेवटच्या षटकात विजयासाठी २१ धावांची आवश्यकता होती. कोलकाताकडून स्ट्राईकवर असलेल्या रिंकूने पहिल्या ३ चेंडूत १ चौकार आणि २ षटकार मारत संघाला विजयाच्या नजीक पोहोचवले होते.

विसाव्या षटकातील पहिल्या ३ चेंडूंनंतर कोलकाताला विजयासाठी ३ चेंडूत फक्त ५ धावांची गरज होती. रिंकूने चौथ्या चेंडूवर २ धावा काढत पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्याकडे घेतली. मात्र पाचव्या चेंडूवर पूर्ण चित्र पालटले. लखनऊकडून गोलंदाजी करत असलेल्या मार्कस स्टॉयनिसने पाचव्या चेंडूवर रिंकूला एविन लुईसच्या हातून झेलबाद झाले. लुईसच्या या सामना पालटणाऱ्या झेलचे भरपूर कौतुक केले आणि लखनऊने इथेच सामना खिशात घातला.

https://twitter.com/Virajtweetkar/status/1526989318543515649?s=20&t=EzOUb_JX8HQ2-zmIOu6PxA

 

परंतु आता क्रिकेट चाहत्यांचे असे म्हणणे आहे की, स्टॉयनिसने ज्या चेंडूवर रिंकूला बाद केले, तो चेंडू नो बॉल होता. अनेकांनी स्टॉयनिसचा हा चेंडू फेकतानाचे फोटो व व्हिडिओ पोस्ट करत हा चेंडू नो बॉल असल्याचा पुरावाही दिला आहे. एका क्रिकेट चाहत्याने स्टॉयनिसचा फोटो शेअर करत लिहिले आहे की, ही खूप मोठी चूक आहे. या नो बॉलमुळे सामन्याचा निकाल आणि प्लेऑफचे संपूर्ण समीकरण पालटू शकत होते. प्रत्येक विकेटनंतर पंचांनी नो बॉल तपासायला पाहिजे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल २०२२च्या अंतिम सामन्याची बदलली वेळ, ७.३० ऐवजी ‘या’ वेळी सुरू होणार थरार

आरसीबीसाठी ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती, प्लेऑफमध्ये क्वालिफाय करण्यासाठी ‘हा’ आहे उपाय

तेव्हा कुंबळे टेलरला म्हणाला होता ‘स्पिनर्सचा कर्दनकाळ’, वाचा न्यूजीलंडच्या दिग्गजाबद्दल सविस्तर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---