---Advertisement---

पोस्ट ग्रेजुएशनची अट असूनही रिंकू सिंगला बेसिक शिक्षण अधिकारी पद कसं मिळालं?

Rinku Singh
---Advertisement---

Rinku Singh: भारताचा युवा स्टार क्रिकेटर रिंकू सिंगची बेसिक शिक्षण अधिकारी पदावर नियुक्ती झाल्याची घोषणा होताच त्याच्या शैक्षणिक पात्रतेवर चर्चा सुरू झाली आहे. लोकसेवा आयोगामार्फत बीएसए पदासाठी भरती केली जाते आणि यासाठी पदव्युत्तर शिक्षण आवश्यक असते. मात्र, रिंकू सिंगच्या शिक्षणाच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. (Rinku Singh BSA Officer)

बीएसए अधिकारी पदासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन अनिवार्य आहे, पण रिंकू सिंगने हायस्कूलपर्यंतचे शिक्षणही पूर्ण केलेले नाही. रिंकू केवळ 9वी पर्यंत शिकलेला असल्याची माहिती आहे. (Rinku Singh Education Qualification)

उत्तर प्रदेश सरकारने खेळाडूंकरिता एक नवीन धोरण लागू केले आहे. ‘आंतरराष्ट्रीय पदक विजेते थेट भरती नियमावली’ अंतर्गत राज्य सरकार आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना थेट भरती करू शकते. या धोरणाअंतर्गत रिंकू सिंगसह आणखी 7 खेळाडूंच्या नियुक्तीस मंजुरी देण्यात आली आहे. (UP athlete direct recruitment policy)

‘अमर उजाला’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, नियुक्तीपूर्वी सर्व खेळाडूंच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली होती.

विभागातील अधिकाऱ्यांच्या मते, आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना विभागात स्थान देण्यामागील हेतू म्हणजे युवकांना प्रेरणा मिळावी आणि खेळाडूंप्रमाणेच सरकारी सेवेत सहभागी व्हावे, हा आहे. या नियमाच्या आधारेच रिंकू सिंगची नियुक्ती होणार आहे. (Rinku Singh Government Job)

रिंकू सिंगच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने भारतासाठी 33 टी20 सामने खेळून 546 धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत 2 वनडे सामने खेळले आहेत. आता रिंकू सिंग पुढीलवेळी ऑगस्टमध्ये बांगलादेशविरुद्ध पांढऱ्या चेंडूच्या मालिकेत खेळताना दिसू शकतो. (Rinku Singh cricket career)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---