सध्या रणजी ट्रॉफीचे सामने सुरू आहेत. या स्पर्धेत अनेक जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळत आहेत. भारतीय संघात निवड झालेले खेळाडू किंवा सध्या टीम इंडियासाठी खेळत नसलेले मर्यादित षटकांचे अनेक खेळाडू रणजी ट्रॉफीमध्ये आपली ताकद दाखवत आहेत. आता उत्तर प्रदेशचा स्टार फलंदाज रिंकू सिंहनं रणजी ट्रॉफीमध्ये आपल्या संघासाठी शानदार खेळी केली.
रणजी ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेश आणि हरियाणा यांच्यात सामना खेळला जात आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हरियाणानं 453 धावा केल्या. संघासाठी दोन फलंदाजांनी शानदार शतकी खेळी खेळली. याशिवाय खालच्या फळीत अनुभवी फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलनंही उत्कृष्ट योगदान देत 48 धावा केल्या.
याला प्रत्युत्तर देताना उत्तर प्रदेशकडून सलामीवीर आर्यन जुयालनं शानदार खेळी केली. मात्र, संघाची मधली फळी फ्लॉप झाली आणि त्यामुळे त्यांच्या 43 धावांत 3 विकेट पडल्या. यानंतर रिंकू सिंहनं आर्यन जुयालसोबत उत्कृष्ट भागीदारी रचली. या दोन फलंदाजांमध्ये चौथ्या विकेटसाठी 162 धावांची जबरदस्त भागीदारी झाली. या भागीदारीदरम्यान रिंकू सिंह आक्रमक मूडमध्ये दिसला. त्यानं 110 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 89 धावांची खेळी केली. त्याच्याकडे शतक झळकावण्याची उत्तम संधी होती, परंतु तो यात यशस्वी झाला नाही.
रिंकू सिंह मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. भारताच्या टी20 संघात त्याची सातत्यानं निवड केली जाते. आतापर्यंत रिंकू सिंहनं भारतासाठी अनेक उत्कृष्ट खेळी खेळल्या आहेत. रिंकूला त्याच्या चौकार आणि षटकारांसाठी ओळखलं जातं. तो जिथेही खेळतो, तिथे आपलं आक्रमक रुप दाखवतो. आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी अशाच प्रकारची राहिल्यास त्याला भारताच्या कसोटी संघात देखील संधी मिळू शकते.
हेही वाचा –
“बरं झालं आम्ही टॉस हरलो”, भारताविरुद्धच्या विजयानंतर न्यूझीलंडचा कर्णधार असं का म्हणाला?
पहिल्या कसोटीतील पराभवानंतर हे तीन भारतीय खेळाडू होऊ शकतात दुसऱ्या सामन्यातून बाहेर
रिषभ पंत पुणे कसोटीतून बाहेर? रोहित शर्मानं दिली मोठी हिंट; जाणून घ्या काय म्हणाला हिटमॅन?