INDvsAUS 2nd T20: गुरुवारपासून (दि. 23 नोव्हेंबर) सुरू झालेल्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना 26 नोव्हेंबर रोजी तिरुवनंतपुरम येथे पार पडला. भारतीय संघाने या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 44 धावांनी धोबीपछाड दिला. या विजयासह भारताने मालिकेत 2-0ने आघाडी घेतली. या सामन्यात रिंकू सिंग पुन्हा चमकला. त्याची खेळी पाहून कर्णधार सूर्यकुमार यादव हादेखील भलताच खुश झाला. आता सामन्यानंतर सूर्यकुमार यादवचे रिंकूविषयी विधान चर्चेत आहे.
रिंकूचा झंझावात
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 4 विकेट्स गमावत 235 धावा केल्या होत्या. भारताला ही धावसंख्या गाठून देण्यात रिंकू सिंग (Rinku Singh) याचाही मोलाचा वाटा होता. रिंकूने या सामन्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना अवघ्या 9 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांचा पाऊस पाडत 31 धावांची नाबाद खेळी केली. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा 344.44 इतका होता.
सूर्याकडून रिंकूचे कौतुक
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने रिंकूच्या खेळीविषयी बोलताना म्हटले की, रिंकूचा धैर्य पाहून त्याला एमएस धोनी (MS Dhoni) याची आठवण आली. सामन्यानंतर तो म्हणाला, “जेव्हा मी अखेरच्या सामन्यात रिंकू सिंगला फलंदाजी करताना पाहिले आणि त्याने जे धैर्य दाखवले, ते शानदार होते. रिंकूने ज्याप्रकारे शांततेत आणि संयम दाखवत सामना संपवला आणि आजचेही त्याचे प्रयत्न पाहून मला कुणाचीतरी आठवण आली.”
ज्यावेळी प्रेझेंटर मुरली कार्तिकने त्याला प्रश्न विचारला की, त्याला रिंकूला पाहून कुणाची आठवण आली? यावर सूर्याने हसत हसत उत्तर दिले की, “प्रत्येकाला माहितीये की, मला कुणाची आठवण आली. तो खेळाडू ज्याने अनेक वर्षांसाठी भारतासाठी हे काम केले आहे.”
ऑस्ट्रेलिया पुन्हा पराभूत
या सामन्यात भारतीय संघाने दिलेल्या 236 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत फक्त 191 धावाच केल्या. यावेळी प्रसिद्ध कृष्णा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 3 विकेट्स नावावर केल्या. (rinku singh reminds suryakumar yadav of this cricketer everyone knows the answer india vs australia 2nd t20i read)
हेही वाचा-
INDvsAUS 2nd T20: सलग दुसरा विजय मिळवताच सूर्याची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मी खेळाडूंना आधीच…’
टीम इंडियाची ‘यंग ब्रिगेड’ सुसाट! सलग दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला चारली धूळ, यशस्वी-बिश्नोई चमकले