स्फोटक फलंदाज रिंकू सिंह आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो. त्यानं 2018 मध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून तो याच संघाचा सदस्य आहे. आता आयपीएल 2025 पूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे, ज्यापूर्वी संघ काही मर्यादित खेळाडूंनाच रिटेन करू शकतात. अशा परिस्थितीत रिंकू केकेआर पासून फारकत घेऊ शकतो. आता रिंकूनं स्वत: सांगितलं की, जर केकेआरनं त्याला रिटेन केलं नाही तर त्याला कोणत्या संघाकडून खेळायला आवडेल.
‘स्पोर्ट्स तक’ सोबत बातचित करताना रिंकू सिंहनं सांगितलं की, जर आयपीएल 2025 च्या ऑक्शनपूर्वी केकेआरनं त्याला रिटेन केलं नाही, तर त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू अर्थातच आरसीबीकडून खेळायला आवडेल. येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, आरसीबीनं अद्याप एकही आयपीएल ट्रॉफी जिंकली नसली तर संघाची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. अनेक मोठ्या खेळाडूंनी या टीमकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून आरसीबीकडून खेळत आहे. रिंकू सिंह विराटचा मोठा चाहता आहे. आयपीएल 2024 दरम्यान रिंकूनं विराटला त्याची बॅटही मागितली होती.
केकेआरनं रिंकूला 2018 मध्ये 80 लाख रुपयांच्या किमतीत खरेदी केलं होतं. त्यानंतर टीमनं त्याला सातत्यानं रिटेन केलं. 2022 मध्ये रिंकूची किंमत थोडी कमी झाली. केकेआरनं त्याला 55 लाख रुपयांच्या किमतीत संघात घेतलं होतं. आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं 45 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यानं 30.79 ची सरासरी आणि 143.34 च्या स्ट्राईक रेटनं 893 धावा ठोकल्या आहेत. या दरम्यान त्यानं 4 अर्धशतकंही झळकावले आहेत. 67 हा त्याचा सर्वाधिक स्कोर आहे.
हेही वाचा –
“याआधी पंत माझ्या कॅप्टन्सीखाली खेळलाय, आता मला त्याच्या…”, भारतीय खेळाडूकडून कौतुक
भारताच्या युवा सलामीवीराला घाबरला ऑस्ट्रेलियन गोलंदाज! दिग्गजाकडे मागितली मदत
भारताने ज्या मैदानावर इतिहास रचला, तिथे आता कसोटी क्रिकेट होणार बंद; काय आहे प्रकरण?