---Advertisement---

BIG BREAKING: ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेतीचा घरात आढळला मृतदेह,‌‌‌‌‌ 32 व्या वर्षी सोडले जग

On: गुरूवार, मे 4, 2023 8:47 PM
---Advertisement---

क्रीडाजगताला हादरवून टाकणारी बातमी समोर येत आहे. गुरुवारी (5 मे) अमेरिकेची दिग्गज धावपटू टोरी बोवी आपल्या राहत्या घरी मृत आढळून आली. मागील काही दिवसांपासून ती कोणालाही दिसली नव्हती. मात्र, आता तिचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

https://www.instagram.com/p/Crx4iVeOV6B/?igshid=YmMyMTA2M2Y=

 

टोरी ही अमेरिकेची एथलिट होती. रिओ ऑलिम्पिकमध्ये तिने धावपटूंच्या रिलेमध्ये सुवर्णपदकासह एकूण तीन पदके ‌‌ पटकावली होती. ती केवळ 32 वर्षांची होती. तिच्या निधनानंतर दिग्गज धावपटू शेली ऍन फ्रेझर हिने दुःख व्यक्त केले. तसेच, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने देखील तिला श्रद्धांजली अर्पण केली.

टोरी मागील काही दिवसांपासून कोणाच्याही संपर्कात नव्हती. गुरुवारी अमेरिकेतील ओरलँडो येथील तिच्या राहत्या घरी तिचा मृतदेह आढळला. तिच्या मॅनेजमेंट करणाऱ्या कंपनीने याबाबत अधिकृत घोषणा केली.

टोरी 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेच्या रिले संघाचा भाग होती. त्यावेळी सुवर्ण‌पदक, रौप्य पदक तसेच कांस्य पदक अशी तीन पदके तिच्या नावे जमा झालेली. या व्यतिरिक्त 2017 मध्ये जागतिक विजेती देखील बनलेली. जून 2022 मध्ये तिने आपली अखेरची स्पर्धा खेळलेली. धावपटूसह ती लांब उडीमध्ये देखील सहभागी होत असत.

(Rio Olympics Gold Medalist Tori Bowie Died At 32)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चौथ्या विजयासाठी केकेआर-सनरायझर्सची झुंज! घरच्या मैदानावर हैदराबादची प्रथम गोलंदाजी
मुंबईच्या फलंदाजांनी अर्शदीपची केली वाताहात! टी20 तील सर्वात लाजिरवाणा विक्रम सिंगच्या नावे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---