साउथम्पटन येथे सुरू असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील पाचव्या दिवसाचा खेळ संपन्न झाला. भारतीय संघाने संपूर्ण दिवसभर वर्चस्व गाजवत या ऐतिहासिक अंतिम सामन्यात किंचितशी आघाडी घेतली. भारतीय गोलंदाजांना प्रथम कामगिरी करत न्यूझीलंडचा पहिला डाव २४९ धावांवर संपुष्टात आला. त्याचवेळी, न्यूझीलंडचा अखेरचा फलंदाज बाद करताना यष्टीरक्षक रिषभ पंतने गोलंदाज रवींद्र जडेजाला सल्ला देत डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
भारतीय गोलंदाजांची भेदक गोलंदाजी
भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात केवळ २१७ धावा बनविल्या होत्या. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज कायले जेमिसन याने पाच बळी मिळवले. त्यानंतर, न्यूझीलंडचा पहिला डाव देखील २४९ धावांच्या पुढे जाऊ शकला नाही. मोहम्मद शमीने सर्वाधिक ४ बळी आपल्या नावे केले. न्यूझीलंडच्या डावातील अखेरचा बळी फिरकीपटू रविंद्र जडेजाने मिळवला.
पंतने दाखवली चलाखी
न्यूझीलंडचा डाव लवकरात लवकर संपवण्याचा भारतीय गोलंदाजांचा मनसुबा होता. मात्र, संघाचा अनुभवी गोलंदाज टिम साऊदी याने संघाच्या धावसंख्येत काही भर घातली. अखेरचा गडी शिल्लक असल्याने त्याने काही आक्रमक फटके मारले. इतर गोलंदाजांना यश मिळत नसल्याचे पाहून कर्णधार विराट कोहलीने रविंद्र जडेजाला गोलंदाजीसाठी पाचारण केले.
साऊदीने जडेजाच्या पहिल्याच चेंडूवर मिड ऑफच्या दिशेने उत्तुंग षटकार ठोकला. साऊदी अशाच प्रकारे फलंदाजी करणार हे माहीत असल्याने यष्टीरक्षण करत असलेल्या रिषभ पंतने जडेजाला सल्ला देत म्हटले, “जड्डू भाई, ग्रॅंडहोमला जे चेंडू टाकले ते टाकावे लागतील.” त्यानंतर, पुढील चेंडूवर जडेजाने साऊदीला त्रिफळाचित करत न्यूझीलंडचा डाव संपुष्टात आणला.
Southee welcomes Jadeja with a 6
Pant: "Jaddu bhai jo Grandhomme ko daal raha tha wahi dalna padegha."
Next ball, Jadeja cleans him up & wraps the Kiwi innings.
With every passing day, Pant is proving to be a great asset for #TeamIndia
Bus ab baarish mat hona #WTCFinal
— Mr. Rad (@shvm_kr) June 22, 2021
https://twitter.com/santanuzn/status/1407358603938254848
रिषभ यापूर्वी देखील अनेकदा गोलंदाजांना यष्ट्यांमागून मार्गदर्शन करताना दिसून आला आहे. तसेच, विरोधी फलंदाजांना स्लेज करतो सामन्यात तो नेहमी चर्चेत राहतो. २०१८-२०१९ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी त्याची ऑस्ट्रेलियन कर्णधार टिम पेन यांच्यासोबत झालेली छोटेखानी खिलाडूवृत्तीची नोकझोक सर्वांना माहीत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विराटच्या नेतृत्वात आर अश्विनने केली उल्लेखनीय कामगिरी, ‘या’ यादीत पोहोचला दुसऱ्या स्थानी
केन विलियम्सनचं अर्धशतक हुकलं, पण स्टिफन फ्लेमिंगला मागे टाकत केला ‘मोठा’ विक्रम
व्हिडिओ: भारताचे ‘सेफ हॅन्ड’ अॅक्शनमध्ये! रहाणेने स्लिपमध्ये घेतला अप्रतिम कॅच