पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे केपीआयटी व सोलिंको यांच्या संलग्नतेने 8 व 10 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील पीएमडीटीए-आयकॉन- सोलिंको ओम दळवी मेमोरीयल ब्रॉन्झ सिरिज स्पर्धेत ऋषभ ए, ओवी मारणे, रेयांश गुंड व समायरा ठाकूर यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विजेतेपद पटकावले.
महाराष्ट्र पोलिस टेनिस जिमखाना, औंध येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत 10 वर्षाखालील मुलांच्या गटात ऋषभ ए यांने देव मूर्तीचा 7-5 असा तर मुलींच्या गटात ओवी मारणे हीने देवांशी पडियाचा 7-6(5) असा टायब्रेकमध्ये पराभव करत विजेतेपद पटकावले. ओवी ही मुक्तांगण इंग्लिश मिडियम स्कुल मध्ये पाचवी इयत्तेत शिकत असून अक्षय शहाणे टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक मिलिंद मारणे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
8 वर्षाखालील मुलांच्या गटात रेयांश गुंड याने आदित्य उपाध्येचा 7-5 असा तर मुलींच्या गटात बिगर मानांकीत समायरा ठाकूरने तिस-या मानांकीत इश्ना नायडूचा (3) 7-2 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. समायरा ही व्हिबग्योर शाळेत शिकत असून निर्भया टेनिस अकादमीत प्रशिक्षक सुरज रॉय व मंगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. मारूती राऊत, प्रविण झिटे व अनूप शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
10वर्षाखालील मुले: उपांत्य फेरी:
देव मूर्ती वि.वि. विराज खानविलकर 6-4
ऋषभ ए. वि.वि.अवधूत निलाखे 6-0
अंतिम फेरी: ऋषभ ए. वि.वि. देव मूर्ती 7-5
10 वर्षांखालील मुली: अंतिम फेरी:
ओवी मारणे वि.वि. देवांशी पडिया 7-6(5)
8 वर्षांखालील मुले: अंतिम फेरी:
रेयांश गुंड वि.वि. आदित्य उपाध्ये 7-5
8वर्षांखालील मुली: अंतिम फेरी:
समायरा ठाकूर वि.वि. इश्ना नायडू (3) 7-2
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ममता बॅनर्जींचा गांगुलीला पाठिंबा; म्हणाल्या, ‘सौरवने स्वत:ला सिद्ध केलंय, मोदीजी…’
‘चेंडू मारण्याची इच्छाच होत नाहीये यार’, म्हणताच पुढच्याच चेंडूवर सूर्यकुमार आऊट; आवाज कॅमेऱ्यात कैद