इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाचवा कसोटी सामना सध्या बर्मिंघमच्या एजबस्टन स्टेडियमवर खेळला जात आहे. उभय संघातील या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने उत्कृष्ट प्रदर्शन केले. पहिल्या डावात पंतने १४६, तर दुसऱ्या डावात ५७ धावांची महत्वाची खेळी केली. या जबरदस्त प्रदर्शनाच्या जोरावर पंतने स्वतःच्या नावपुढे काही महत्वाचे विक्रम जमा केले आहेत.
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने पंतच्या शतकाच्या जोरावर ४१६ धावा केल्या. प्रत्युत्तरात जेव्हा इंग्लंडचा संघ फलंदाजीसाठी आला, तेव्हा २८४ धावांवर त्यांचे सर्व खेळाडू बाद झाले. दुसऱ्या डावात भारतीय संघ फलंदाजीसाठी आला, तेव्हा रिषभ पंत (Rishabh Pant) ५७ धावा करून बाद झाला. म्हणजेच पंतने या सामन्यात एकूण २०३ धावा केल्या. या प्रदर्शनाच्या जोरावर पंत सेना देशांमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) खेळेल्या गेलेल्या कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे.
सेना देशातील कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारे भारतीय यष्टीरक्षक
२०३ – रिषभ पंत विरुद्ध इंग्लंड (२०२२)
१५९ – रिषभ पंत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२०१९)
१५१ – एमएस धोनी विरुद्ध इंग्लंड (२०११)
१३३ – रिषभ पंत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२०२१)
या यादीत पहिल्या क्रमांकावर पंत आहे, ज्याने इंग्लंडविरुद्धच्या चालू सामन्यात २०३ धावा केल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर देखील पंतचेच नाव आहे, जेव्हा त्याने २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात १५९ धावा केल्या होत्या. तिसऱ्या क्रमांकावर माजी कर्णधार एमएस धोनी आहे. धोनीने २०११ मध्ये इंग्लंडमध्ये खेळलेल्या कसोटी सामन्यात १५१ धावा केल्या होत्या. चौथ्या क्रमांकावर पुन्हा एकदा पंतचेच नाव आहे. पंतने २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियातील एका कसोटीमध्ये १३३ धावा केल्या होत्या.
दरम्यान, पंत एखाद्या कसोटी सामन्यात २०० पेक्षा मोठी खेळी करणारा भारताचा तिसरा यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे. यापूर्वी बुधी कुदररन यांनी १९६४ आणि एमएस धोनीने २०१३ मध्ये अशी कामगिरी केली आहे. रिषभ पंत या यादीत नव्याने सहभागी झाला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्य –
पाचवी कसोटी संपण्यापूर्वी सिराज भावूक; म्हणाला, ‘इंग्लंडविरुद्धचा मालिका विजय अविस्मरणीय..’
चेंडूच ‘असा’ होता की…, पाहा विराटच्या सपोर्टमध्ये काय म्हणाला इंग्लंडचा माजी फिरकीपटू
पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने पंतची तुलना थेट ब्रायन लाराशी केली, म्हणाला…