दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून उभय संघात ५ सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेत भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडू, विराट कोहली, जसप्रीत बुमराह तसेच कर्णधार रोहित शर्मा यांना विश्रांती देण्यात आली आहे. तसेच प्रभारी कर्णधार केएल राहुल याला दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडावे लागले आहे. त्यामुळे दिल्ली येथे झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात यष्टीरक्षक रिषभ पंत याच्या खांद्यावर नेतृत्त्वाचा भार सोपवण्यात आला होता. परंतु त्याला ती जबाबदारी योग्यरित्या पार पाडता न आल्याने नकोशा विक्रमात त्याने माजी कर्णधार विराट कोहली याची बरोबरी केली आहे.
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात (First T20I Match) भारताला ७ विकेट्सने पराभव पाहावा लागला. प्रथम फलंदाजी करताना इशान किशनच्या (Ishan Kishan) ७६ धावांच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर भारतीय संघाने २० षटकात ४ विकेट्स गमावत २११ धावा केल्या होत्या. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सहज हे लक्ष्य गाठले. रॅस्सी वॅन डर डूसेन (नाबाद ७५ धावा) आणि डेविड मिलर (नाबाद ६४ धावा) यांची अभेद्य शतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने १९.१ षटकात ७ विकेट्स शिल्लक ठेवून सामना जिंकला.
पंतने विराटच्या लाजिरवाण्या विक्रमाची केली बरोबरी
अशाप्रकारे कर्णधार म्हणून पंतला (Rishabh Pant) पहिल्याच टी२० सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे (Indian Captain To Loose First T20I) लागले. यासह पंतने भारतीय संघाचे नेतृत्व करताना पहिला टी२० सामना गमावण्याचा नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. विराट कोहलीनंतर पंत ही नकोशी कामगिरी करणारा भारताचा दुसराच कर्णधार बनला आहे. विराटने (Virat Kohli) २०१७ मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिल्यांदाच भारताच्या टी२० संघाचे नेतृत्त्व करताना सामना गमावला होता. इंग्लंडने ७ विकेट्सने या सामन्यात भारताला धूळ चारली होती.
विराटइतक्याच धावाही पंतने केल्या
याखेरीज पंतचा कर्णधार म्हणून पहिला टी२० सामना बऱ्याच प्रमाणात विराटसारखा राहिला. दोघांनाही त्यांच्या पहिल्या सामन्यात ७ विकेट्सने पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच दोघांनीही पहिल्या टी२० सामन्यात समान धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पंतला २९ धावाच करता आल्या. १६ चेंडू खेळताना २ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने त्याने ही खेळी केली. विराटनेही कर्णधार म्हणून त्याचा पहिला टी२० सामना खेळताना २९ धावाच केल्या होत्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
जेव्हा दीपिकाने मल्या पुत्राला लाईव्ह मॅचमध्ये केली होती किस, चांगलीच रंगलेली चर्चा
भारत पहिली टी२० का हरला? आयपीएल आहे त्याचं कारण, स्वतः आफ्रिकेच्या खेळाडूनेच सांगितलंय
IND vs SA । पहिला टी२० सामना हरल्यानंतर कर्णधार रिषभ पंतने स्पष्ट केले कारण, म्हणाला…