भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यासाठी टीम इंडिया सध्या मैदानात खूप घाम गाळत आहे.
दरम्यान, भारताचे खेळाडू सरावादरम्यान मस्तीच्या मूडमध्ये दिसले. रिषभ पंत सहसा त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो, मात्र यावेळी त्यानं गोलंदाजीत आपला हात आजमावला. पंतनं जसप्रीत बुमराहला गोलंदाजी केली आणि त्याला बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला.
बीसीसीआयनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये रिषभ पंतनं गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केलला विचारलं की त्यानं बुमराहला बाद केलं आहे की नाही? त्यानंतर बुमराह म्हणतो की, रिषभची बॉलिंग ॲक्शन हाशिम आमलासारखी आहे. रिषभ आणि बुमराह यांच्यातील वादविवाद रंजक होता, कारण एकीकडे बुमराहनं दावा केला की तो बाद होणार नाही. तर दुसरीकडे रिषभ पंतनं सांगितलं की, त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एक विकेट घेतली आहे.
रिषभ पंतनं सुरुवातील फुल लेन्थचे 2-3 चेंडू टाकले, जे बुमराहनं सहज खेळले. यानंतर पंतनं बाउन्सर टाकला, ज्यावर बुमराहनं जबरदस्त पुल शॉट मारला. हा शॉट खूप शक्तिशाली होता, ज्यामुळे चेंडू सीमारेषेच्या बाहेर पडला असावा. मात्र या शॉटवर बुमराह झेलबाद होईल, असा दावा पंतनं केला. तो हे मोर्ने मॉर्केलला विचारायला गेला असता त्यानं कोणतंही स्पष्ट उत्तर दिलं नाही. या व्हिडिओमध्ये बुमराह चौकार मारण्याचा दावा करताना दिसत होता, तर दुसरीकडे पंत त्याला सतत चिडवत होता.
View this post on Instagram
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये रिषभ पंत सरासरी खूप चांगली आहे. या मालिकेत त्यानं 7 सामने खेळले असून 62.40 च्या सरासरीनं 624 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, जसप्रीत बुमराहकडे पाहिलं तर त्याने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या इतिहासात 7 सामने खेळून 32 विकेट घेतल्या आहेत.
हेही वाचा –
IND vs SA: चाैथ्या टी20 मध्ये जोहान्सबर्गची खेळपट्टी घातक? जाणून घ्या कोणाला मिळणार फायदा!
चौथ्या टी20 मध्ये संजू सॅमसनचा पत्ता कट होणार? दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन जाणून घ्या
हे तीन खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्माचे उत्तराधिकारी, माजी क्रिकेटपटूचा विश्वास